शिऊर पोलिसांनी दुचाकीचोरांना केली अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:04 AM2021-09-21T04:04:37+5:302021-09-21T04:04:37+5:30
या कारवाईत पोलिसांनी बापुसाहेब भगवान काळे (२१, रा. आलापूरवाडी) व हरिभाऊ कचरू पवार (रा. बोरसर) या दोघांना अटक केली ...
या कारवाईत पोलिसांनी बापुसाहेब भगवान काळे (२१, रा. आलापूरवाडी) व हरिभाऊ कचरू पवार (रा. बोरसर) या दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून १.३० लाख रुपये किमतीच्या चार दुचाकी हस्तगत केल्या आहेत. तर, किशोर हिरामण महापुरे (रा. खांडवा, जि. बुलडाणा) यास घरफोडी प्रकरणात गजाआड केले आहे. तो मनेगावफाटा येथून शिऊरला येत असल्याचे कळल्यानंतर शिऊरचे एपीआय निलेश केळे यांनी तातडीने पोलिसांचे पथक रवाना केले. सपोनि आर.आर. जाधव पुढील तपास करीत आहेत.
-------
मित्राच्या घरावर छापा टाकला अन् चोरटा अडकला
शिऊर गावातून १४ सप्टेंबर रोजी रामदास जाधव व १८ सप्टेंबर रोजी सचिन शेळके यांच्या दुचाकी चोरी गेल्या होत्या. चोरी झालेली दुचाकी (क्र. एम एच २० एफ टी १३९९) बापुसाहेब काळे हा चोरून घेऊन गेला आहे. सध्या तो बोरसर गावात मित्राच्या घरी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोउपनि अंकुश नागटिळक, आर.आर. जाधव, हेडकॉन्स्टेबल कासम शेख, पोलीस नाईक अविनाश भास्कर यांच्या पथकाने बोरसर गावातील हरिभाऊ पवार यांच्या घरावर छापा मारला. तेव्हा त्यांच्या घरासमोर चोरीस गेलेली दुचाकी आढळून आली. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी कैलास प्रजापती यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
200921\save_20210920_183528~2.jpg
फोटो