कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे शिवजयंती मिरवणूक रद्द, वस्तीत, चौकात पूजन करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:03 AM2021-02-20T04:03:26+5:302021-02-20T04:03:26+5:30
शिवजयंती उत्सवातील मिरवणूक रद्द करून शहरात ठिकठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळे व प्रतिमेस पूजन करून उत्सव साजरा करावा, ...
शिवजयंती उत्सवातील मिरवणूक रद्द करून शहरात ठिकठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळे व प्रतिमेस पूजन करून उत्सव साजरा करावा, असे आवाहन जिल्हा उत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार, अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी केले आहे. सर्व समित्यांंनी, नागरिकांनी पालन करावे, मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले.
मिरवणूक रद्द, होणार अभिवादन
नवीन औरंगाबाद शिवजयंती उत्सव समितीतर्फे गजानन महाराज मंदिर चौकात सायंकाळी ५.३० वाजता अभिवादन करण्यात येणार आहे. कोविड-१९च्या विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून समितीने निर्णय घेतला आहे. अभिवादन कार्यक्रमास विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत, असे संस्थापक अध्यक्ष बबन डिडोरे पाटील, उत्सव समिती अध्यक्ष विलास शेळके यांनी कळविले आहे.
मुकुंदवाडीत वृक्षारोपण, अभिवादन
मुकुंदवाडी येथे शिवजयंती शुक्रवारी सकाळी ९ वाजता ध्वजारोहण, अभिवादन, वृक्षारोपण आणि मान्यवरांना फराळ वाटप करून उत्सव साजरा होणार आहे. कोविड-१९ संसर्ग टाळण्यासाठी नियमांचे पालन होणार आहे, असे संस्थापक अध्यक्ष मोतीलाल जगताप, अध्यक्ष प्रा. पी. एम. वाघ, सीताराम मोरे यांनी कळविले.