‘सीएमआयए’च्या अध्यक्षपदी शिवप्रसाद जाजू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:04 AM2021-07-07T04:04:11+5:302021-07-07T04:04:11+5:30
औरंगाबाद : चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर (सीएमआयए) या उद्योग संघटनेच्या अध्यक्षपदी शिवप्रसाद जाजू, तर मानद सचिवपदी सतीश ...
औरंगाबाद : चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर (सीएमआयए) या उद्योग संघटनेच्या अध्यक्षपदी शिवप्रसाद जाजू, तर मानद सचिवपदी सतीश लोणीकर यांची निवड करण्यात आली.
सोमवारी ‘सीएमआयए’च्या कार्यकारी समितीच्या बैठकीत सन २०२१-२२ या वर्षासाठी निवडण्यात आलेली नवीन कार्यकारिणी अशी, उपाध्यक्ष- नितीन गुप्ता, मानद सहसचिव- अनिल माळी, मानद कोषाध्यक्ष- प्रीतिश चटर्जी, मानद सहकोषाध्यक्ष- शिरीश तांबे, कार्यकारिणी सदस्य अभयराज कपूर, अशोक काळे, नितीन काबरा, सुयोग माच्छर, रितेश मिश्रा, सुरेश ताडकर, को-ओप्ट कार्यकारिणी सदस्य दुष्यंत पाटील, हिमांशू गुप्ता, मनोज पित्ती, नीलेश कापडिया, राजेश पाटणी, रासदीपसिंग चावला, सौरभ भोगले आदी.
मावळते अध्यक्ष कमलेश धूत यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष शिवप्रसाद जाजू व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले. यावेळी ते म्हणाले की, मागील वर्षात ‘फाइट अगेन्स्ट कोविड’च्या माध्यमातून संघटनेला मानवतेचा चेहरा मिळाला. या उपक्रमाद्वारे कोविड साथरोगाच्या उपचारासाठी विविध वैद्यकीय उपकरणे देणगी स्वरूपात देण्यात आली. यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष शिवप्रसाद जाजू यांनी औरंगाबादेत नवनवीन उद्योग गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी तसेच निर्यातवाढीसाठी प्रयत्न केले जातील, असे सांगितले. मानद सचिव सतीश लोणीकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून आभार मानले.