राज्यात शिवसेना-भाजपचा पोरखेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 12:50 AM2018-07-20T00:50:57+5:302018-07-20T00:53:00+5:30
मुख्यमंत्री, मंत्री हे केंद्रातून हाकलले जातात. रिझर्व्ह बँक, निवडणूक आयोगावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे नियंत्रण आहे. कोणाला काही बोलू दिले जात नाही. देशात ही एक प्रकारे आणीबाणीची परिस्थिती आहे. दुसरीकडे राज्यात शिवसेना आणि भाजपचा पोरखेळ सुरू आहे, या शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : मुख्यमंत्री, मंत्री हे केंद्रातून हाकलले जातात. रिझर्व्ह बँक, निवडणूक आयोगावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे नियंत्रण आहे. कोणाला काही बोलू दिले जात नाही. देशात ही एक प्रकारे आणीबाणीची परिस्थिती आहे. दुसरीकडे राज्यात शिवसेना आणि भाजपचा पोरखेळ सुरू आहे, या शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला.
मनसेनेच्या पदाधिकाºयांचा गुरुवारी (दि. १९) तापडिया नाट्यमंदिरात मेळावा झाला. यावेळी ते बोलत होते. मनसेचे अभिजित पानसे, राजू पाटील, संदीप देशपांडे, आदित्य शिरोडकर, अविनाश अभ्यंकर, अनिल शिदोरी, राजेश येरुनकर, भास्कर गाडेकर, शहराध्यक्ष सतनामसिंग गुलाटी, शहर उपाध्यक्ष आशिष सुरडकर, अब्दुल रशीद खान यांची उपस्थिती होती.
ठाकरे म्हणाले, सत्तेवर बसलेल्यांना लोक विटले आहेत. लोकांसमोर पर्याय नाही. त्यामुळे मराठवाड्यात अनेक प्रश्न आ वासून उभा आहे. देशात सध्या सदृृढ लोकशाही नाही. नोटाबंदीनंतर देशात साडेतीन कोटी लोकांच्या नोकºया गेल्या. केंद्र सरकार विकासकामे दाखवू शकत नाही. राजकीय उद्दिष्ट साध्य करण्यासाठी दंगली घडविल्या जातात. पुढेही हाच धोका आहे.
नोटाबंदीनंतर भाजपकडे पैसा
नोटाबंदीनंतर भाजपकडे जेवढे पैसे आले तेवढे त्यापूर्वी नव्हते. उद्योगपतींकडे पैसे मागत असे. आता उद्योगपती नको आहेत. निवडणुकीत काळा पैसा बाहेर येत आहे, असा आरोप त्यांनी केला.
दंगलीने २५०० कोटींची
गुंतवणूक रद्द
विप्रो कंपनी २ हजार ५०० कोटींची गुंतवणूक औरंगाबादेत करणार होती. नवीन नोकºया निर्माण होणार होत्या; परंतु ज्या दिवशी औरंगाबादेत दंगल झाली, त्या दिवशी विप्रो कंपनीने शहरातील प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घेतला. एका दंगलीने हे सगळे झाले.
काँग्रेस- राष्टÑवादी परवडली
ठाकरे म्हणाले, मोदी सरकार खोटं बोलणारं सरकार असून, काँँग्रेस -राष्ट्रवादी काँग्रेस परवडले, असे म्हणण्याची वेळ येत आहे. शिवसेना-भाजप एकमेकांवर आरोप करतात. केंद्र सरकारवर अविश्वास ठराव येत आहे. त्यात शिवसेना काय करते, हे पाहायचे आहे. शिवसेना नाणार प्रकल्पाला विरोध करीत आहे. केंद्र सरकार पाठिंबा देत आहे.
मनपा खाऊन रिकामी करण्यासाठी नाही
औरंगाबादेत कचºयाचा प्रश्न भीषण बनला आहे. नाशिक महापालिका ५ वर्षे मनसेच्या हातात होती. कचरा व्यवस्थापनाचे तेथे केलेले नियोजन जाऊन पहा. ज्यांच्या हातात २५ ते ३० वर्षे शहराची सत्ता दिली, त्यांच्याकडून हे झाले नाही. शहर बकाल होत आहे. पालिका खाऊन फक्त रिकामी करण्यासाठी नाही, अशी टीका राज ठाकरे यांनी मेळाव्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत केली. मनसेने नाशिकमध्ये कचरा व्यवस्थापनाचे उत्तम नियोजन केले आहे. डम्पिंग ग्राऊंड, कचरा गोळा करण्याची पद्धत, घंटागाड्यांना जीपीआरएसने जोडले आहे. त्यावर काटेकोर निरीक्षण ठेवले जाते. ओला-सुक्या कचºयातून खत प्रकल्प केला. प्लास्टिक पिशव्यांपासून इथोनॉल बनविले जाते. ते उद्योगांकडून विकत घेतले जाते. ही सर्व यंत्रणा केवळ पाच वर्षात उभारली. औरंगाबादेत शिवसेनेच्या हातात इतके वर्षे सत्ता दिली. सत्ताधाºयांनी काहीही केले नाही, याबाबत नागरिकांनी जाब विचारला पाहिजे.
‘लोकमत’चे कौतुक
सरकारवर टीका करू नये, अशी परिस्थिती देशात निर्माण केली जात आहे. काही लिहू द्यायचे नाही, बोलू द्यायचे नाही. माध्यमांवर दबाव आणला जातो. याविरुद्ध कुणीच काही बोलत नाही. काही जण सरकारच्या धोरणांवर टीका करीत आहेत, आपली जबाबदारी पार पाडत आहेत, असे सांगत राज ठाकरे यांनी ‘लोकमत’चे कौतुक केले. यावेळी त्यांनी एका मराठी वृत्तवाहिनीचा अणि दोन वर्तमानपत्रांचाही उल्लेख केला.