सलूनचालकाच्या मृत्यूप्रकरणी जमावाला भडकवणाऱ्यांवर कारवाईची शिवसेनेची पोलीस आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:03 AM2021-04-18T04:03:26+5:302021-04-18T04:03:26+5:30
उस्मानपुरा परिसरातील पीरबाजार येथे सलून सुरू ठेवल्याने कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांसोबत बोलत असताना अचानक चक्कर येऊन खाली कोसळ्याने सलूनचालक फेरोज ...
उस्मानपुरा परिसरातील पीरबाजार येथे सलून सुरू ठेवल्याने कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांसोबत बोलत असताना अचानक चक्कर येऊन खाली कोसळ्याने सलूनचालक फेरोज खान कदीर खान (वय ५१, रा.पीरबाजार, उस्मानपुरा परिसर) यांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली होती. या घटनेनंतर जमावाने पोलिसांनी केलेल्या मारहाणीत फेरोज खान यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत उस्मानपुरा पोलीस ठाण्यासमोर जवळपास दोन तास गोंधळ घातला.
या घटनेनंतर सीसीटीव्ही फुटेजवरून फेरोज यांचा चक्कर येऊन खाली पडल्याने डोक्याला जबर मार लागून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. जमावाला कोणी भडकवले ? सोशल मीडियावर पोलिसांबाबत नागरिकांमध्ये चुकीची माहिती पसरविण्यात आली. पोलिसांची बदनामी करीत पोलीस दलाचे मनोधैर्य खच्ची करणाऱ्या दोषींवर गुन्हे दाखल करायची मागणी निवेदनात केली आहे.