'उद्याचा निकाल उद्धव ठाकरेंच्या बाजूनं लागू दे'; चंद्रकांत खैरे करताय प्रार्थना

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2022 07:03 PM2022-08-03T19:03:29+5:302022-08-03T19:23:27+5:30

खरी शिवसेना ही स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचीच आहे, असंही चंद्रकांत खैरे यांनी सांगितलं.

Shiv Sena leader Chandrakant Khaire is praying to God that tomorrow's result will be applied in favor of Uddhav Thackeray. | 'उद्याचा निकाल उद्धव ठाकरेंच्या बाजूनं लागू दे'; चंद्रकांत खैरे करताय प्रार्थना

'उद्याचा निकाल उद्धव ठाकरेंच्या बाजूनं लागू दे'; चंद्रकांत खैरे करताय प्रार्थना

googlenewsNext

औरंगाबाद- राज्यातील शिंदे सरकारच्या भवितव्याबाबत महत्त्वपूर्ण सुनावणी सुप्रिम कोर्टात सुरू आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल हे युक्तिवाद करत आहेत. तर शिंदे गटाकडून हरिश साळवे आणि नीरज कौल युक्तिवाद करत आहे. तसेच महाराष्ट्राचे राज्यापाल भगत सिंह कोश्यारी यांच्या बाजूने तुषार मेहता यांच्याकडून युक्तिवाद करण्यात आला. 

सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून गुरुवारी सकाळी सुनावणी घेऊ असं सरन्यायाधीशांनी म्हटलं आहे. उद्या कामकाज सुरु झाल्यानंतर ही सुनावणी पहिल्या क्रमांकावर असेल असं न्यायालयाने सांगितलं आहे. न्यायालयाने शिंदे गटाचे वकील हरिश साळवे यांना नव्याने लेखी युक्तिवाद सादर करण्यास सांगितलं आहे. यादरम्यान शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 

सर्वोच्च न्यायालयामध्ये वकिलांनी चांगली बाजू मांडलेली आहे. उद्याचा हा निकाल शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागू दे, अशी आम्ही देवाला प्रार्थना करत असल्याचं चंद्रकांत खैरे यांनी सांगितलं. तसेच खरी शिवसेना ही स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचीच आहे. मात्र निष्कारण काही लोकांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संभ्रम निर्माण केल्याचे चंद्रकांत खैरे म्हणाले.

शिंदे गटाचं दुसऱ्या पक्षात विलीनीकरण हाच एकमेव पर्याय असल्याचा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी उद्धव ठाकरेंच्या बाजूनं केला. तुम्ही दोन तृतीयांश असला तरी मूळ पक्षावर दावा करू शकत नाही. दोन तृतीयांश पक्ष असलेल्या दुसऱ्या पक्षात विलीन होऊ शकता. दोन तृतीयांश लोक दुसर्‍या पक्षात विलीन होणे किंवा नवीन पक्ष स्थापन करणे हा एकमेव मार्ग असल्याचं कपिल सिब्बल यांना यावेळी सांगितलं. 

दरम्यान, आपला नेता भेटत नाही म्हणून नवा पक्ष स्थापन करु शकतो का? अशी विचारणा सरन्यायाधीशांनी केली. यावर शिंदे गटाकडून हरिश साळवे यांनी बंडखोर आमदार पक्षातच आहेत असं सांगितलं. यावर सरन्यायाधीशांनी तुम्ही सध्या कोण आहात? असं विचारलं असता आम्ही पक्षातील नाराज सदस्य असल्याचं सांगण्यात आलं. तसेच भारतामध्ये आपण अनेकदा काही नेते, व्यक्ती म्हणजेच पक्ष समजण्याची चूक करतो. जर पक्षातील काही लोकांना मुख्यमंत्री बदलावा असं वाटत असेल तर ही पक्षविरोधी नाही. हा पक्षांतर्गत मुद्दा आहे असं हरिश साळवे यांनी स्पष्ट केलं. 

Web Title: Shiv Sena leader Chandrakant Khaire is praying to God that tomorrow's result will be applied in favor of Uddhav Thackeray.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.