शिवसेना खासदार जिल्हाधिकाऱ्यांना भेटले
By Admin | Published: August 27, 2014 01:13 AM2014-08-27T01:13:35+5:302014-08-27T01:36:07+5:30
जालना : जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा, या मागणीसाठी शिवसेना खासदारांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मंगळवारी जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांची भेट घेऊन
जालना : जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा, या मागणीसाठी शिवसेना खासदारांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मंगळवारी जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली व निवेदन दिले.
पक्षाचे नेते खा. अरविंद सावंत, खा. सदाशिव लोखंडे, जिल्हा संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर, माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, जि.प. अध्यक्षा आशा भुतेकर, माजी आ. शिवाजी चोथे, आ. संतोष सांबरे, उपनेते लक्ष्मण वडले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्ह्यात पावसाअभावी शेतकऱ्यांसमोर निर्माण झालेले प्रश्न मांडले. गारपिट व अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त गावांना प्रत्येक शेतकऱ्यांना त्वरीत मदत करा, मोसंबी फळबाग पिकांचे पैसे शेतकऱ्यांना अद्याप मिळाले नाही, त्वरीत पैसे देण्यात यावे, शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा, वीज बिल व घरगुती बिल त्वरीत माफ करा इत्यादी मागण्या यावेळी करण्यात आल्या. या शिष्टमंडळात जिल्हाप्रमुख ए.जे. बोराडे, युवा सेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे, पंडितराव भुतेकर, जगन्नाथ काकडे, अॅड. भास्कर मगरे, संतोष मोहिते यांचा सहभाग होता.