इंधन दरवाढीच्या विरोधात सोयगावात शिवसेनेचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:06 AM2021-02-06T04:06:56+5:302021-02-06T04:06:56+5:30
केंद्राने जीवनावश्यक वस्तूंचे दरवाढ नियंत्रणात आणावी, नसता याहून अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे. कोरोना ...
केंद्राने जीवनावश्यक वस्तूंचे दरवाढ नियंत्रणात आणावी, नसता याहून अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे.
कोरोना तसेच नैसर्गिक संकटाने शेतकरी, सर्वसामान्य जनता हवालदिल झालेली असताना केंद्र सरकार इंधन व जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढवीत आहे. सर्वसामान्यांवर केंद्र सरकार अन्याय करीत असल्याची टीका यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख प्रभाकर काळे यांनी केली. आंदोलनानंतर तहसीलदार प्रवीण पांडे यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी शहरप्रमुख संतोष बोडखे, संघटक दिलीप मचे, माजी शहरप्रमुख गजानन चौधरी, अक्षय काळे, रमेश गव्हांडे, दिलीप देसाई, कृष्णा राऊत, चंद्रास रोकडे, दिनेश हजारी, भगवान वारंगणे, डॉ. फुसे, हिरा चव्हाण, मुनाफ शेख, मोतीराम पंडित, सुरेश चव्हाण, कैलासअप्पा काळे, किशोर मापारी आदी उपस्थित होते.
फोटो :
शिवसेनेच्या आंदोलनादरम्यान निवेदन देताना तालुकाप्रमुख प्रभाकर काळे व इतर.
050221\ynsakal75-050829829_1.jpg
शिवसेनेच्या आंदोलनादरम्यान निवेदन देतांना तालुकाप्रमुख प्रभाकर काळे व इतर.