घरपट्टी वाढीविरोधात शिवसेनेचा एल्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2017 12:19 AM2017-08-25T00:19:04+5:302017-08-25T00:19:04+5:30
शहर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येणाºया घरपट्टी व मालमत्ता करातील वाढी विरोधात शिवसेनेने एल्गार पुकारला असून, गुरुवारी या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शहर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येणाºया घरपट्टी व मालमत्ता करातील वाढी विरोधात शिवसेनेने एल्गार पुकारला असून, गुरुवारी या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले़
परभणी महानगरपालिकेने घरपट्टी व इतर करवाढीच्या अनुषंगाने घेतलेल्या निर्णयाला शिवसेनेकडून तीव्र विरोध केला जात आहे़ ही करवाढ मागे घेवून नागरिकांना दिलेल्या नोटिसा रद्द कराव्यात, या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले़ या उपोषणात खा़ बंडू जाधव, आ़ डॉ़ राहुल पाटील, शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख डॉ़ विवेक नावंदर, जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव, कल्याणराव रेंगे, उपजिल्हाप्रमुख संजय गाडगे, सदाशिव देशमुख, दशरथ भोसले, नंदकुमार आवचार, ज्ञानेश्वर पवार, संदीप भंडारी, माणिक पोंढे, अनिल डहाळे, नवनीत पाचपोर, सोपानराव आवचार, प्रभाकर जैस्वाल, जि़प़ सदस्य राम खराबे, ज्ञानेश्वर गिरी, रविंद्र पतंगे, माणिकराव घुंबरे, राजू देशमुख, गजानन देशमुख, चंदू शिंदे, अतुल सरोदे, विजय ठाकूर, प्रशास ठाकूर, सुशील कांबळे आदींची उपस्थिती होती़ यावेळी बोलताना आ़ डॉ़ राहुल पाटील म्हणाले की, १९९९ पासून नगरपालिका व आताच्या मनपाने कोणतीही करवाढ केलेली नाही़ अचानक कर वाढ करून नागरिकांवर बोजा टाकला जात आहे़ जाचक नोटिसा बजावून दहशतीचे वातावरण निर्माण केले जात आहे़ मनपाने दिलेली नोटीसच चुकीची असून, ती रद्द करावी, तसेच करवाढही स्थगित करावी, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन केले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला़ यावेळी खा़ बंडू जाधव यांनीही मार्गदर्शन करताना मनपाची दरवाढ चुकीची असल्याचे सांगून सर्वसामान्यांवर बोजा पडू देणार नाही़ वेळप्रसंगी रस्त्यावर उतरू असा इशारा दिला़ प्रशासनाच्या वतीने तहसीलदार विद्याचरण कडवकर यांनी आंदोलनस्थळी येऊन मागण्यांचे निवेदन स्वीकारले़