शिंदेसेनेच्या प्रदीप जैस्वाल यांनी दुसऱ्यांदा कापली 'MIM'च्या पतंगाची दोर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2024 12:31 PM2024-11-24T12:31:08+5:302024-11-24T12:32:46+5:30

मध्य मतदारसंघ: ८ हजार ११९ मतांनी एमआयएमचे नासेर सिद्दीकी यांचा पराभव

Shiv Sena's Pradeep Jaiswal cuts the string of MIM's kite for the second time from Aurangabad Central | शिंदेसेनेच्या प्रदीप जैस्वाल यांनी दुसऱ्यांदा कापली 'MIM'च्या पतंगाची दोर

शिंदेसेनेच्या प्रदीप जैस्वाल यांनी दुसऱ्यांदा कापली 'MIM'च्या पतंगाची दोर

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद मध्य मतदारसंघात शिंदेसेनेचे प्रदीप जैस्वाल यांनी दुसऱ्यांदा एमआयएम पक्षाचे उमेदवार नासेर सिद्दीकी यांचा ८ हजार ११९ मतांची दारूण पराभव केला. २०१९ मध्ये जैस्वाल यांनीच सिद्दीकी यांचा पराभव केला होता. २०१४ चा अपवादवगळता जैस्वाल यांनी २००९, २०१९ आणि २०२४ मध्ये विजयी गुलाल उधळला.

हिंदू मतांच्या विभाजनासाठी उद्धवसेनेचे उमेदवार किशनचंद तनवाणी यांनी निवडणुकीतून माघार घेतली होती. याच ठिकाणी जैस्वाल यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला होता. मात्र, निवडणूक प्रचारात उद्धवसेनेचे बाळासाहेब थोरात यांनी मुसंडी मारल्याने जैस्वाल आणि त्यांचे समर्थक विचलित झाले होते. मागील निवडणुकीपेक्षा तीन हजार अधिक मते घेत जैस्वाल यांनी विजयावर शिक्कामोर्तब केले. या निकालात अनेक नाट्यमय घडामोडीही पाहायला मिळाल्या. सलग १४ व्या फेरीपर्यंत आघाडी घेतलेल्या जैस्वाल यांना १५ व्या फेरीत अचानक धक्का बसला. सिद्दीकी यांनी मुसंडी मारत ४ हजारांची लीड घेतली. हे मताधिक्य घटविण्यासाठी जैस्वाल यांना १९ व्या फेरीपर्यंत संघर्ष करावा लागला. २० व्या फेरीत पुन्हा जैस्वाल यांनी २६०३ मतांची लीड घेतली. शेवटपर्यंत सिद्दीकी यांना ही लीड तोडता आली नाही. शेवटी २३ व्या फेरीत जैस्वाल ८ हजार ११९ मतांनी निवडून आले. उद्धवसेनेचे उमेदवार बाळासाहेब थोरात यांना ३७ हजार ९८ मतांवर समाधान मानावे लागले. वंचितचे जावेद कुरैशी यांना १२ हजार ६३९ मते मिळाली.

८५,४५९: जैस्वाल यांना मिळालेली मते

प्रदीप जैस्वाल-उद्धवसेना
विजयाची तीन कारणे
१- लाडकी बहिणी योजनेसह अडीच वर्षात मतदारसंघातील गुंठेवारी भागात केलेली विकासकामे कामाला आली.
२- हिंदू मतांच्या विभाजनासाठी माजी आ. किशनचंद तनवाणी यांनी घेतलेली माघार बरीच फायदेशीर ठरली.
३- विविध समाजाचे भरभरून मतदान, निवडणुकीत जैस्वाल यांच्या मुलांनी केलेले नियोजन यशस्वी झाले.

नासेर सिद्दीकी यांच्या पराभवाची कारणे
१- लोकसभेत इम्तियाज जलील यांनी ८५ हजार मते मिळाली होती तेवढी मते नासेर सिद्दीकी यांना मिळाली नाहीत.
२- मतदानाच्या दिवशी मुस्लिम बहुल भागात मतदारांमध्ये उदासीनता, कुठेही मतदारांच्या रांगा नव्हत्या.
३- एमआयएम पक्षातील बहुतांश कार्यकर्ते, पदाधिकारी २४ तास पूर्वमध्ये काम करत होते.

‘मध्य’मध्ये उमेदवारांना मिळालेली मते
उमेदवार- पक्ष- मिळालेली मते
प्रदीप जैस्वाल - शिंदेसेना -८५,४५९
नासेर सिद्दीकी - ‘एमआयएम’- ७७,३४०
डाॅ. बाळासाहेब थोरात- उद्धवसेना - ३७,०९८
मो. जावेद मो. इसाक- वंचित बहुजन आघाडी -१२,६३९
सुहास दाशरथे- मनसे - ११४५
विष्णू तुकाराम वाघमारे- बहुजन समाज पार्टी-८९६
नदीम राणा- ऑल इंडिया मजलीस-ए-इकलाब-ए-मिल्लत- १८८
नवाब अहेमद शेख- बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी- १०२
डाॅ. प्रमोद मोतीराम दुथडे - प्रहार जनशक्ती पार्टी- ११५०
ॲड. बबनगीर उत्तमगीर गोसावी- हिंदुस्तान जनता पार्टी- ३८१
मुजम्मिल खान नुरुल हसन खान- सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया - ३१८
सचिन अशोक निकम- रिपब्लिकन सेना- ८०७
सुनील भुजंगराव अवचरमल- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (रिफाॅरमिस्ट)-१६७
सुरेंद्र दिगंबर गजभारे- मराठवाडा मुक्ती मोर्चा- १५१
संदीप जाधव- पीपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक) - १६३
अब्बास मैदू शेख- अपक्ष-३५६
कांचन चंद्रकांत जांबोटी- अपक्ष- ३१४
जयवंत (बंडू) ओक- अपक्ष- ५८४
मोहम्मद युसूफ सज्जाद खान- अपक्ष- ४९३
मंगेश रमेश कुमावत- १०३
महंत विजय आचार्य जी- अपक्ष- १५१
शकील इब्राहिम सय्यद- अपक्ष- ९२
सुरेश गोविंदराव गायकवाड- अपक्ष-७३
हिशाम उस्मानी- अपक्ष- ४६८
वरीलपैकी कोणीही नाही (नोटा)- ९३८

 

Web Title: Shiv Sena's Pradeep Jaiswal cuts the string of MIM's kite for the second time from Aurangabad Central

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.