भालगाव येथे शिवा ट्रस्टचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:05 AM2021-05-08T04:05:41+5:302021-05-08T04:05:41+5:30

औरंगाबाद : कोरोना महामारीच्या लाटेत शिवा ट्रस्टने प्रशासनाला मदतीचा हात दिला आहे. भालगाव येथे यशवंतराव चव्हाण आयुर्वेदिक महाविद्यालय ...

Of Shiva Trust at Bhalgaon | भालगाव येथे शिवा ट्रस्टचे

भालगाव येथे शिवा ट्रस्टचे

googlenewsNext

औरंगाबाद : कोरोना महामारीच्या लाटेत शिवा ट्रस्टने प्रशासनाला मदतीचा हात दिला आहे. भालगाव येथे यशवंतराव चव्हाण आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालयात मोफत सेवा देण्यासाठी १०० खाटांचे कोविड केअर सेंटर सुरू केले आहे.

लाॅकडाऊन काळात संस्थेने १६८४ मजुरांना आधार दिला होता. गेल्यावर्षीही कोविड केअर सेंटर संस्थेने सुरू करून ९३४ बाधितांना उपचार दिले होते. रुग्णांना येथे दोन वेळचे जेवण, सकाळी चहा, नाश्ता सुद्धा पुरविण्यात येतो. सध्या येथील कोविड सेंटरमध्ये ४१ रुग्ण उपचार घेत असून, आतापर्यंत ५०२ रुग्णांना सुटी दिलेली आहे. संस्थेचे अध्यक्ष डॉ. बाळासाहेब पवार हे स्वत: लक्ष देऊन रुग्णांची विचारपूस करतात, तर प्राचार्य डॉ. भैरव कुलकर्णी, उपप्राचार्य डॉ. पंकज गहुंगे, डॉ. वैजिनाथ यादव, जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री पवार, परिचारिका कल्पना शिंगणे तसेच डॉ. संदीप कांबळे, डॉ. विपुल गंगवाल, डॉ. सीमा कुरुळे, डॉ. आशाश्री शिंदे, दीपक अपार, डॉ. राणी वैराळे, डॉ. अली बडगिरे, डॉ. सुप्रिया सुरडकर, डॉ. राजश्री शिलिमकर, कार्यालयीन अधीक्षक सतीश पाटील, रुग्णालय प्रमुख अनिल झाल्टे आदी रुग्णसेवेसाठी परिश्रम घेत आहेत.

Web Title: Of Shiva Trust at Bhalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.