‘वायसीआयपी’त येताच शिवाजी महाराजांचे दर्शन !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 12:47 AM2017-09-11T00:47:01+5:302017-09-11T00:47:01+5:30
छत्रपती शिवाजी महाराज यांची गडावर जाऊन हातात झेंडा घेत दिलेली गर्जना अशी हुबेहूब आकर्षक आणि लक्षवेधी प्रतिकृती येथील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट आॅफ पॉलिटेक्निक महाविद्यालयात पहावयास मिळत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : प्रत्येकाच्या मनात, हृदयात घर करुन असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची गडावर जाऊन हातात झेंडा घेत दिलेली गर्जना अशी हुबेहूब आकर्षक आणि लक्षवेधी प्रतिकृती येथील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट आॅफ पॉलिटेक्निक महाविद्यालयात पहावयास मिळत आहे. ही प्रतिकृती पाहण्यासाठी विद्यार्थ्यांसह शहरातील नागरिकही आता गर्दी करु लागले आहेत.
महाविद्यालयातील सिव्हील विभागातील अजय बांगर, वैभव यादव, सुदीप डोंगर संदेश देशमुख, शुभम बोंबलगे या विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेऊन अवघ्या १० दिवसात केवळ दीड हजार रुपये खर्च करुन ही आकर्षक प्रतिकृती बनवली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी जिद्द आणि आत्मविश्वासाच्या बळावर अनेक गड सर केले. त्यानंतर गडावर जाऊन त्यांनी भगवा फडकवत शान राखली. त्यामुळेच आपण महाराजांना डोळ्यासमोर ठेवून ही प्रतिकृती बनविल्याचे विद्यार्थ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.