वाकी येथील शिवेश्वराची यात्रा रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:04 AM2021-03-10T04:04:37+5:302021-03-10T04:04:37+5:30
चिंचोली लिंबाजी : कन्नड तालुक्याचे आराध्य दैवत असलेल्या शिवेश्वर देवस्थान-वाकी येथील तीन दिवसीय यात्रा उत्सव कोरोनामुळे रद्द करण्यात आला ...
चिंचोली लिंबाजी : कन्नड तालुक्याचे आराध्य दैवत असलेल्या शिवेश्वर देवस्थान-वाकी येथील तीन दिवसीय यात्रा उत्सव कोरोनामुळे रद्द करण्यात आला आहे, अशी माहिती देवस्थानचे उत्तराधिकारी ह.भ.प. नामदेव महाराज पल्हाळ यांनी दिली.
पूर्णा नदीकाठी वसलेल्या शिवेश्वराच्या दर्शनासाठी महाशिवरात्रीनिमित्त राज्यभरातून भाविक मोठ्या संख्येने येथे येतात. मात्र, यंदा प्रथमच कोरोना महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भाविकांना शिवेश्वराच्या दर्शनापासून वंचित राहावे लागणार आहे. प्रशासनाने गर्दीला आळा घालण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून महाशिवरात्रीनिमित्त ज्या धार्मिकस्थळांवर दर्शनासाठी गर्दी होते. आशा धार्मिकस्थळे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने वाकी येथील शिवेश्वराचे मंदिर भाविकांसाठी बंद राहणार आहे. दरवर्षीप्रमाणे आयोजित होणारा अखंड हरिनाम सप्ताह व रामकथा सोहळा ५ मार्चपासून मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत साजरा केला जात आहे.