शिवसेना, काँग्रेसने काढले भापला चिमटे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 10:39 PM2018-12-11T22:39:01+5:302018-12-11T22:39:55+5:30

राज्यातील भाजप सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले. त्यामुळे मंगळवारी सर्वसाधारण सभेत शासनाच्या अभिनंदनाचा ठराव भाजपने ठेवला. भाजपला घायाळ करण्यासाठी दुसऱ्या क्षणाला शिवसेना, काँग्रेस नगरसेवकांनी पाच राज्यातील विधानसभा निवडणूकांच्या मुद्यावर विजयी पक्षांच्या अभिवनंदनाचा ठराव आणला. दोन्ही ठराव महापौरांनी मंजूर केले.

Shivsena, Congress removed bapala tongs ... | शिवसेना, काँग्रेसने काढले भापला चिमटे...

शिवसेना, काँग्रेसने काढले भापला चिमटे...

googlenewsNext

औरंगाबाद : राज्यातील भाजप सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले. त्यामुळे मंगळवारी सर्वसाधारण सभेत शासनाच्या अभिनंदनाचा ठराव भाजपने ठेवला. भाजपला घायाळ करण्यासाठी दुसऱ्या क्षणाला शिवसेना, काँग्रेस नगरसेवकांनी पाच राज्यातील विधानसभा निवडणूकांच्या मुद्यावर विजयी पक्षांच्या अभिवनंदनाचा ठराव आणला. दोन्ही ठराव महापौरांनी मंजूर केले. यावेळी भाजप नगरसेवकांना जोरदार चिमटे काढण्याची संधी दोन्ही पक्षांनी सोडली नाही.
मंगळवारी सकाळी सर्वसाधारण सभेला सुरूवात होताच मराठा समाजाला नुकतेच आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. सरकारच्या अभिनंदनाचा ठराव भाजपतर्फेच मांडण्यात आला. त्याला भाजपच्याच बहुतांश नगरसेवकांनी अनुमोदन दिले. काँग्रेसनेही आरक्षण सहजासहजी मिळालेले नाही, त्यासाठी ४५ जण हुतात्मा झाले, त्यानंतर शासनाला जाग आली, अशी बोचरी टीका करीत ठरावाला अनुमोदनही दिले. शिवसेनेने मराठा आरक्षणासोबत शासनाने इतरही बरीच आश्वासने दिली होती. ती अद्याप पूर्ण झाली नाहीत. आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणे, आर्थिक मदत यांसह इतर आश्वासने पूर्ण झाल्यानंतरच अभिनंदन करण्यात यावे, असा टोला मारण्यात आला. भाजप नगरसेवकांना घायाळ केल्यानंतर लगेच काँग्रेस नगरसेवकांनी पाच राज्यांच्या निवडणूकांमध्ये काँग्रेसला घवघवीत यश मिळत आहे. राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांचे अभिनंदन करण्याचा ठराव मांडला. त्यावर भाजप नगरसेवकांनी अद्याप बहुमत नाही, पुढे काय होतेय ते पहा... असे सांगत ठरावाची खिल्ली उडविण्याचा प्रयत्न केला. अखेर महापौैरांनी सर्व ठराव मंजूर केले.

Web Title: Shivsena, Congress removed bapala tongs ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.