शिवसेनेने केले मुंडण आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 11:57 PM2017-08-22T23:57:46+5:302017-08-22T23:57:46+5:30

येथे यापूर्वी कर्जमाफी झालेल्या शेतकºयांच्या याद्या बँकेत लावण्याच्या मागणीसाठी ढोल वाजवून आंदोलन करणाºया शिवसेनेने आज जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर सरकारच्या मढ्याच्या नावाने रडापड करून दशक्रियाविधीसह मुंडण आंदोलन केले. तसेच बोंबही ठोकली. जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर शिवसेनेने आज भाजप सरकारच्या नावाने सकाळी ११ वाजता आंदोलनास प्रारंभ झाला. यावेळी जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी भाजप सरकारच्या मढ्याच्या नावाने रडापड केली

Shivsena made the banana Munda movement | शिवसेनेने केले मुंडण आंदोलन

शिवसेनेने केले मुंडण आंदोलन

googlenewsNext

हिंगोली : येथे यापूर्वी कर्जमाफी झालेल्या शेतकºयांच्या याद्या बँकेत लावण्याच्या मागणीसाठी ढोल वाजवून आंदोलन करणाºया शिवसेनेने आज जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर सरकारच्या मढ्याच्या नावाने रडापड करून दशक्रियाविधीसह मुंडण आंदोलन केले. तसेच बोंबही ठोकली.
जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर शिवसेनेने आज भाजप सरकारच्या नावाने सकाळी ११ वाजता आंदोलनास प्रारंभ झाला. यावेळी जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी भाजप सरकारच्या मढ्याच्या नावाने रडापड केली. ढोल वाजवा आंदोलन करूनही शासनाने कोणत्याच बँकेसमोर कर्जमाफी झालेल्या शेतकºयांच्या याद्या लावल्या नाहीत. त्यामुळे आज मुंडण आंदोलन केले. कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती रामेश्वर शिंदे, कडुजी भवर यांचे मुंडण करण्यात आले.
त्यानंतर जिल्हा उपनिबंधक सुधीर म्हेत्रेवार यांची आंदोलकांनी भेट घेतली. यावेळी म्हेत्रेवार यांना कर्जमाफीच्या प्रक्रियेबाबत माहिती विचारली. तेव्हा जिल्ह्यात ६९६ केंद्रांवरून कर्जमाफीसाठीचे अर्ज भरून घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. तर दीड लाखांपेक्षा कमी कर्ज घेतलेले ६६0२५ असल्याचे सांगितले. यात ३६२ कोटी रुपयांची रक्कम त्यांच्याकडे थकित असल्याचे ते म्हणाले. तर त्यापेक्षा जास्त थकबाकी असलेल्या खातेदारांची संख्या १0 हजार ६८७ व रक्कम २९३ कोटी असून ते या योजनेत उर्वरित हप्ते भरून लाभ घेण्यास उत्सुक असल्यास ते भरू शकतात, असेही ते म्हणाले. तर एका कुटुंबात एकालाच कर्जमाफीत लाभ मिळू शकतो, इतरांना मिळणार नाही, असे स्पष्टपणे सांगण्यात आले.
यावेळी जिल्हाप्रमुख संतोष बांगर, सभापती रामेश्वर शिंदे, कडुजी भवर, सुभाष बांगर, दिलीप बांगर, राम कदम, भानुदास जाधव, दिलीप घुगे, गोपू पाटील, आनंदराव जगताप आदींसह शिवसैनिकांची उपस्थिती होती.

Web Title: Shivsena made the banana Munda movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.