शिवसेनेने बँकेसमोर वाजविला ढोल

By Admin | Published: July 11, 2017 12:16 AM2017-07-11T00:16:39+5:302017-07-11T00:18:41+5:30

नांदेड: सरकारच्या घोषणेनंतर शेतकऱ्यांना मिळालेल्या कर्जमुक्तीची यादी देण्यात यावी यासह इतर मागण्यांसाठी शिवसेनेच्या वतीने सोमवारी नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर ढोल वाजवून आंदोलन करण्यात आले़

Shivsena played in front of the bank | शिवसेनेने बँकेसमोर वाजविला ढोल

शिवसेनेने बँकेसमोर वाजविला ढोल

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: सरकारच्या घोषणेनंतर शेतकऱ्यांना मिळालेल्या कर्जमुक्तीची यादी देण्यात यावी यासह इतर मागण्यांसाठी शिवसेनेच्या वतीने सोमवारी नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर ढोल वाजवून आंदोलन करण्यात आले़ त्यानंतर बँकेचे अध्यक्ष आ़प्रताप पाटील चिखलीकर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले़
सरकारकडून शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेली कर्जमाफीची घोषणा फसवी असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे़ जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत जिल्ह्यातील केवळ ४ हजार ६०३ शेतकरी कर्जमुक्तीसाठी पात्र ठरत असून त्यांच्या कर्जाची ८ कोटी ५३ लाख २० हजार रुपये माफ होणार आहेत़ १६ तालुक्यांच्या नांदेड जिल्ह्यात मध्यवर्ती बँकेमार्फत कर्जमुक्ती होणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या नगण्य आहे़ जून २०१७ पर्यंत कर्जमाफी करा या प्रमुख मागणीसह पात्र शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध कराव्यात यासाठी हे आंदोलन करण्यात आले़ त्यासाठी आ़ हेमंत पाटील यांच्या नेतृत्वात जिल्हा बँकेसमोर ढोल वाजविण्यात आला़
त्यानंतर बँकेचे अध्यक्ष आ़ चिखलीकर व मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कदम यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले़ आंदोलनात जिल्हाप्रमुख मिलिंद देशमुख, भुजंग पाटील, धोंडू पाटील, डॉ. मनोज भंडारी, प्रकाश मारावार, जयवंत कदम, महेश खेडकर, विनय सगर, महेश खेडकर, उमेश मुंढे, बालाजी कल्याणकर, माधव पावडे, दत्ता कोकाटे, साई विभूते, नेताजी भोसले, विरोधी पक्ष नेता बंडू खेडकर, नारायण कदम, श्याम बंग, तुलजेश यादव, अशोक उमरेकर, अवतारसिंह पहरेदार, गौरव कोटगिरे आदींचा सहभाग होता़

Web Title: Shivsena played in front of the bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.