शिवसेना लोकवाट्यातून आॅईल देण्यास तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 12:09 AM2017-11-29T00:09:50+5:302017-11-29T00:09:55+5:30

जिल्ह्यातील रोहित्रांचा प्रश्न काही केल्या सुटत नाही. यावर आॅईल नसल्याचेच कारण सांगितले जात आहे. जर महावितरण हे आॅईल उपलब्ध करून देऊ शकत नसेल तर तोपर्यंत शेतकºयांचे कंबरडे मोडून जाणार आहे. त्यामुळे शंभर रोहित्रांसाठी लागणारे आॅईल लोकवाट्यातून देवू, असे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी सांगितले.

Shivsena is ready to give the oil out of the public | शिवसेना लोकवाट्यातून आॅईल देण्यास तयार

शिवसेना लोकवाट्यातून आॅईल देण्यास तयार

googlenewsNext
ठळक मुद्देसंतोष बांगर : महावितरणने प्रस्ताव पाठवावा

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्यातील रोहित्रांचा प्रश्न काही केल्या सुटत नाही. यावर आॅईल नसल्याचेच कारण सांगितले जात आहे. जर महावितरण हे आॅईल उपलब्ध करून देऊ शकत नसेल तर तोपर्यंत शेतकºयांचे कंबरडे मोडून जाणार आहे. त्यामुळे शंभर रोहित्रांसाठी लागणारे आॅईल लोकवाट्यातून देवू, असे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी सांगितले.
बांगर म्हणाले, जिल्ह्यात रोहित्र जळण्याचे प्रमाण काही कमी होत नाही. शिवाय यापूर्वी जळालेलेच अनेक रोहित्र अजूनही तसेच पडून आहेत. त्यामुळे शेतकºयांना नाहक चकरा माराव्या लागत आहेत. अनेक शेतकरी डोळ्यासमोर उभ्या वाळणाºया पिकांपोटी महावितरणसह पुढाºयांचे उंबरे झिजवत आहेत. आमच्याकडेही दररोज शेकडो शेतकरी येत आहेत. त्यामुळे शिवसेनेने लोकवाट्यातून किमान शंभर रोहित्रांसाठी लागणारा निधी उभारून देण्याचा निर्धार केला आहे. महावितरणच्या अधिकाºयांनी तसा प्रस्ताव वरिष्ठांकडून मंजूर करून घ्यावा. महावितरणला कमी लेखण्यासाठी नव्हे, तर शेतकºयांना दिलासा मिळण्यासाठी निधी देणार आहोत. त्यामुळे सकारात्मक निर्णय घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
महावितरणच्या अधिकाºयांनी मात्र ही बाब महावितरणच्या नियमात बसणारी नसल्याने हा पर्याय स्वीकारणे अवघड असल्याचे सांगितले.

Web Title: Shivsena is ready to give the oil out of the public

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.