शिवसेनेच्या सरपंच उषा साळे यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 11:10 PM2019-07-30T23:10:57+5:302019-07-30T23:11:22+5:30

सरपंच उषा साळे यांच्यावर मंगळवारी १४ सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे.

Shivsena sarpanch Usha Saale filed a mistrust resolution | शिवसेनेच्या सरपंच उषा साळे यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव दाखल

शिवसेनेच्या सरपंच उषा साळे यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव दाखल

googlenewsNext

वाळूज महानगर : शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या वडगाव-बजाजनगर ग्रामपंचायतीच्या सरपंच उषा साळे यांच्यावर मंगळवारी १४ सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. या प्रस्तावामुळे ऐन विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या असतानाच शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे.


वडगाव-बजाजनगर ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेने १७ पैकी १५ जागा मिळवून ग्रामपंचायत आपल्या ताब्यात घेतली. अपक्ष निवडून आलेल्या उषा साळे यांनी निवडणुकीनंतर शिवसेनेत प्रवेश केला.

त्यामुळे शिवसेनेचे संख्याबळ १६ वर गेले. तत्कालीन सरपंच महेश भोंडवे यांच्यावर वर्षभरापूर्वी अविश्वास ठराव आणून उषा एकनाथ साळे यांची सरपंचपदी नेमणूक करण्यात आली. यावेळी पहिले ६ महिने उषा साळे त्यानंतरची ६ महिने सचिन गरड व शेवटची ६ महिने श्रीकांत साळे यांनी सरपंच होण्याचा तोंडी ठराव झाला होता.

परंतू सरपंच पदाचा वर्षभराचा कार्यकाळ लोटूनही साळे यांनी इतर सदस्यांना दिलेला शब्द पाळला नाही. त्यामुळे सदस्यांमध्ये सरपंच साळे यांच्या विषयी नाराजी होती. वरिष्ठांचा पाठिंबा मिळत असल्याने सरपंच साळे यांनी सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करायला सुरुवात केली. तक्रारी करुनही वरिष्ठे नेते मंडळी दखल घेत नसल्याने व ग्रामपंचायतीच्या कामाकाजात विश्वासात घेतले जात नसल्याने नाराज सदस्यांनी सरपंच उषा साळे यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव दाखल करण्यासाठी सदस्यांची जुळवा जुळव सुरु केली.


१४ सदस्यांचा प्रस्ताव
उपसरपंच हौसाबाई पाटोळे, सचिन गरड, श्रीकांत साळे, महेश भोंडवे, रमाकांत भांगे, वैशाली जिवरग, संगीता कासार, सुरेखा लगड, उषा हांडे, श्रीकृष्ण भोळे, मंदा भोकरे, अलका शिंदे, मोहन गिरी, अरुण वाहुळ या सदस्यांनी मंगळवारी तहसीलदार यांची भेट घेवून सरपंच उषा साळे यांच्या विरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. या संदर्भात तहसीलदार यांनी विशेष सभेचे आयोजन करण्यासाठी संबंधितांना नोटिसा देण्याचे आदेश अधिकाऱ्यांना बजावले आहेत.

Web Title: Shivsena sarpanch Usha Saale filed a mistrust resolution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.