शिवसेनेचे ढोलनाद आंदोलन
By Admin | Published: July 11, 2017 12:00 AM2017-07-11T00:00:21+5:302017-07-11T00:05:11+5:30
परभणी : शासनाच्या कर्जमाफी योजनेस पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांची यादी तत्काळ द्यावी, या मागणीसाठी १० जुलै रोजी शिवसेनेच्या वतीने जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर ढोलनाद आंदोलन करण्यात आले़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शासनाच्या कर्जमाफी योजनेस पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांची यादी तत्काळ द्यावी, या मागणीसाठी १० जुलै रोजी शिवसेनेच्या वतीने जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर ढोलनाद आंदोलन करण्यात आले़
महाराष्ट्र शासनाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे़ परंतु, कर्जमाफी योजनेच्या लाभाविषयी संभ्रम आहे़ त्यामुळे योजनेचा प्रत्यक्ष किती शेतकऱ्यांना लाभ झाला़, त्या शेतकऱ्यांची नावे देण्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार सोमवारी जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर ढोलनाद आंदोलन करण्यात आले़ खा़ संजय जाधव, आ़ डॉ़ राहुल पाटील, डॉ़ विवेक नावंदर, गंगाप्रसाद आणेराव, डॉ़ संजय कच्छवे, अॅड़प्रताप बांगर आदींची भाषणे झाली़
जिल्हा बँकेचे व्यवस्थापक विष्णू जाधव यांना निवेदन देण्यात आले़ दोन दिवसांत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची यादी देण्यात येईल, असे आश्वासन जाधव यांनी दिले़ त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले़
या आंदोलनात उपजिल्हाप्रमुख सदाशिवराव देशमुख, दशरथ भोसले, मधुकर निरपणे, संजय गाडगे, हनुमंतराव पौळ, विष्णू मांडे, रणजीत गजमल, भारत पवार, काशीनाथ काळबांडे, विष्णू मुरकुटे, रवींद्र धर्मे, सखूबाई लटपटे, गोपीनाथ झाडे, बाळासाहेब घाटुळ, दगडू काळदाते, ज्ञानेश्वर पवार, महेश साळापुरीकर, मनीष कदम, कुसुमताई पिल्लेवाड, अंजली पवार आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते़