शिवसेनेची पडझड सुरूच...
By Admin | Published: April 29, 2017 12:44 AM2017-04-29T00:44:01+5:302017-04-29T00:47:09+5:30
उस्मानाबाद : जिल्ह्यातील शिवसेनेची पडझड मागील काही दिवसांपासून सुरूच आहे.
उस्मानाबाद : जिल्ह्यातील शिवसेनेची पडझड मागील काही दिवसांपासून सुरूच आहे. माजी जिल्हाप्रमुख सुधीर पाटील यांनी गुरूवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केल्यानंतर शुक्रवारी भूमचे माजी तालुकाप्रमुख काकासाहेब चव्हाण यांच्यासह कार्यकर्ते आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या उपस्थितीत भाजपात दाखल झाले. त्यामुळे भविष्यात विशेषत: ईटसह परिसरात शिवसेनेला मोठे नुकसान सोसावे लागणार आहे.
मागील काही दिवसांपासून शिवसेनेतून आऊटगोर्इंग सुरू आहे. माजी जिल्हाप्रमुख सुधीर पाटील यांच्या पाठोपाठ आता भूमचे माजी तालुकाप्रमुख काकासाहेब चव्हाण हेही भाजपात दाखल झाले आहेत. शिवसेनेमध्ये सध्या निष्ठावंत शिवसैैनिकांना महत्व राहिले नसून केवळ पैैशेवाल्यांचा विचार केला होतो, अशा शब्दात चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली. सध्या जिल्ह्यातील सेनेत प्रचंड गटबाजी निर्माण झाली आहे. त्यामुळे निष्ठावंत शिवसैैनिकांचा वेळोवेळी आवाज दाबण्याचे काम होत आहे. बाळासाहेबांच्या शिवसेनेत आमच्यासारख्या शिवसैैनिकांना सन्मान मिळत असे. परंतु, आता पैशेवाल्यांची सेना झाली आहे. कालपरवा पक्षात आलेले आमचे मालक म्हणून मिरवू लागले आहेत. चुकीच्या धोरणांना विरोध केल्यानंतर आम्हाला शिवसेनेपासून दूर ठेवण्याचे काम झाले. अशा राजकारणाला कंटाळूनच विकासाचे राजकारण करणाऱ्या भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याचे चव्हाण यांनी नमूद केले. यावेळी शिवेसेनेच ईट शहर प्रमुख बाबा डोके, जयराम डोके, ज्येष्ठ शिवसैैनिक अर्जुन डोके, विक्रम पिसाळ,दिलीप देशपांडे आदी पदाधिकारी भाजपात दाखल झाले.