महागाई विरोधात शिवसेना रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 12:54 AM2017-09-29T00:54:47+5:302017-09-29T00:54:47+5:30

वाढती महागाई व कोलमडलेल्या कायदा व सुव्यवस्थेच्या निषेधार्थ गुरुवारी शिवसेनेच्या वतीने शहरातून मोर्चा काढण्यात आला.

Shivsena's rally against inflation | महागाई विरोधात शिवसेना रस्त्यावर

महागाई विरोधात शिवसेना रस्त्यावर

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : पेट्रोल, डिझेल, गॅस तसेच जीवनावश्यक वस्तूंचे वाढलेले दर यामुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. असे असताना सरकार अच्छे दिनच्या नावाखाली सर्वसामाºयांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप शिवसेनेच्या पदाधिका-यांनी केला. वाढती महागाई व कोलमडलेल्या कायदा व सुव्यवस्थेच्या निषेधार्थ गुरुवारी शिवसेनेच्या वतीने शहरातून मोर्चा काढण्यात आला. यात शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी सहभाग घेतला.
शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, ए. जे. बोराडे यांच्या नेतृत्त्वाखाली शहरातील मामा चौकातून मोर्चास सुरुवात झाली. माजी आ. संतोष सांबरे, जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुध्द खोतकर, किसान सेनेचे भानुदास घुगे, पांडुरंग डोंगरे, भरत मदन, माधवराव कदम, भगवान कदम, रावसाहेब राऊत, रमेश गव्हाड, परमेश्वर जगताप, मनिष श्रीवास्तव, बाबासाहेब इंगळे, भाऊसाहेब पाऊलबुध्दे, अ‍ॅड. भास्कर मगरे, सविता किवंडे या पदाधिका-यांनी या मोर्चात सहभाग घेतला. शिवसेनेचे काही पदाधिकारी बैलागाडीसह सायकल चालवत या मोर्चात सहभागी झाले. अंबिका मार्केटमध्ये मोर्चाचे रुपांतर सभेत करण्यात आले. अंबेकर म्हणाले, की जनतेच्या प्रश्नांवर बोलण्याची जबाबदारी असणारे विरोधी पक्षनेते आम्हाला सत्तेत राहून विरोध का करता, असे विचारतात. राज्यात विरोधी पक्षच राहिला नसल्याने शिवसेनेलाच विरोधी पक्षाची भूमिका बजावावी लागत आहे. शेतकरी व व्यापाºयांवर दाखल गुन्हे मागे घेण्याची मागणी त्यांनी केली. शिवाजीराव चोथे यांनी कर्जमाफीसाठी आॅनलाईन फॉर्म भरावे लागल्यामुळे शेतकºयांना त्रास झाल्याची खंत व्यक्त करत सरकारच्या धोरणावर टीका केली. जिल्हाप्रमुख बोराडे यांनी पोलीस प्रशासनाचा वचक कमी झाला असून जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचे नमूद केले. मोर्चाच्या शेवटी शासनाचे प्रतिनिधी तहसीलदार विपिन पाटील यांना सर्व मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख संतोष मोहिते, हरिभाऊ पोहेकर, जयप्रकाश चव्हाण, नवनाथ दौड, माधवराव हिवाळे, बजरंग बोरसे, पंकज सोळंके, उद्धव मरकड, बाबासाहेब तेलगड, प्रसाद बोराडे, शहरप्रमुख विष्णू पाचफुले आदींनी सहभाग घेतला.

Web Title: Shivsena's rally against inflation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.