महावितरणलाच ‘शॉक’
By Admin | Published: November 26, 2014 12:25 AM2014-11-26T00:25:48+5:302014-11-26T01:10:23+5:30
बीड : शहरातील नागरिकांकडे वीजेची थकबाकी कोटीच्या घरात आहे. वसुली करता-करता महावितरणच्या नाकीनऊ येत आहे तर दुसऱ्या बाजूला सर्रासपणे आकडे टाकून वीज चोरी
बीड : शहरातील नागरिकांकडे वीजेची थकबाकी कोटीच्या घरात आहे. वसुली करता-करता महावितरणच्या नाकीनऊ येत आहे तर दुसऱ्या बाजूला सर्रासपणे आकडे टाकून वीज चोरी होत असल्याचा गैरप्र्रकार ‘लोकमत’ने समोर आणला आहे. आकडे टाकून वीज चोरणे हा प्रकार नवा नसला तरी हा प्रकार थांबलेला नाही हे दाखविण्यासाठी हा केलेला प्रामाणिक प्रयत्न. शहरी व ग्रामीण भागात ‘लोकमत’ने स्टींग आॅपरेशन करून विजेची होणारी चोरी चव्हाट्यावर आणली आहे.
शहराला महिन्याकाठी १२ मेगा युनिटची वीजेची आवश्यकता असते. यामधील ७.१० मेगा युनिट विजेचा वापर प्रत्यक्ष ग्राहकांसाठी केला जातो. यामधून महिन्याकाठी महावितरणला ४ कोटी ३१ लाख रुपये पदरी पडतात. मात्र महिन्याकाठी ४.९ मेगा युनिटचा तोटा महावितरणला सहन करावा लागत आहे. उवरित जवळपास ५ मेगा युनिटची विजेची चोरी, गळती व तांत्रिक बिघाडमुळे हा तोटा होत असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, ‘दुष्काळात तेरावा महिना’ अशीच अवस्था महावितरणची झाली आहे. बीड शहराची वसूली कोटीच्या घरात आहे. वसुलीकरिता महावितरण कडून प्रयत्न केले जात आहेत. ग्राहकांची वीज बील अदा करण्याची मानसिकता नसल्याने दिवसेंदिवस थकबाकीत वाढच होत आहे. तर दुसरी शहरातील काही भागात वीज बील भरण्याच्या भानगडीत न पडण्याचा फंडा ग्राहकांना अवलंबला आहे. शहरात व ग्रामीण भागात आजही दिवसाढवळ्या आकडी टाकून विजेची चोरी केली जात आहे. शहरातील थकबाकी लक्षात घेता महावितरणला ५ कोटी ६६ लाखाचे उद्दीष्ट दिले गेले आहे. त्यापैकी महिन्याकाठी सरासरी ३ कोटी ७७ लाखाची वसूली होत आहे. म्हणजेच महिन्याला २ कोटीचा फटका महावितरणला सहन करावा लागत आहे. यामध्ये आकडे टाकून वीज चोरी केल्यानेही महावितरणला आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
ढाबे, हॉटेल्स आकड्यावरच
शहरालगतचे बार्शी नाक्यावरील हॉटेल्स, ढाब्यावर कोणत्याही प्रकारचे मीटर लावण्यात आले नव्हते. भरचौकातील लहान-मोठ्या हॉटेलधारकांनी आकड्याच्या सहाय्यानेच वीज घेतली असल्याचे निदर्शनास आले. शहरातील दुर्गम भागातच अधिक वीजचोरी केली जात आहे. या भागात वायरमनही ढुंकूनही पाहत नसल्याने या परिसरात खुलेआम आकडी टाकली जात आहे.(प्रतिनिधी)