मृत्यूच्या दारात असलेल्या रुग्णांचे रेमडेसिविर पळवून काळ्याबाजारात विक्री; पोलीस तपासात धक्कादायक खुलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 01:27 PM2021-04-29T13:27:32+5:302021-04-29T13:31:56+5:30

remdesivir black marketing : कोविड सेंटरमधून इंजेक्शन चोरी करणारा मुख्य आरोपी अफरोजखान हा नेहमी रात्रपाळीलाच कामावर जात असे.

Shocking! Corona Patients on the verge of death are sold on the black market by smuggling remedivir | मृत्यूच्या दारात असलेल्या रुग्णांचे रेमडेसिविर पळवून काळ्याबाजारात विक्री; पोलीस तपासात धक्कादायक खुलासा

मृत्यूच्या दारात असलेल्या रुग्णांचे रेमडेसिविर पळवून काळ्याबाजारात विक्री; पोलीस तपासात धक्कादायक खुलासा

googlenewsNext
ठळक मुद्दे सापळा रचून पोलिसांनी एका पाठोपाठ सात आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणांहून पकडले. या टोळीला न्यायालयाने १ मेपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात

औरंगाबाद : कोरोना संसर्गामुळे मृत्यूच्या दाढेत गेलेल्या रुग्णाला देण्यासाठी आणलेले आणि मयत झालेल्या रुग्णांचे उरलेले रेमडेसिविर इंजेक्शन आरोपी अफरोज कोविड सेंटरमधून पळवित असल्याचे पोलीस तपासात समोर आले. त्याने साथीदारामार्फत आतापर्यंत किती रेमडेसिविर इंजेक्शन ब्लॅकमध्ये विक्री केले, याचा तपास पोलिसांनी सुरू केला.

मुख्य आरोपी अफरोज खान इकबाल खान, दिनेश कान्हू नवगिरे (२८, जयभीमनगर टाऊन हॉल), साईनाथ अण्णा वाहुळ (रा. रामनगर), रवी रोहिदास डोंगरे (रा. भाग्यनगर), संदीप सुखदेव रगडे, प्रवीण शिवनाथ बोर्डे आणि नरेंद्र मुरलीधर साबळे (सर्व. रा. बदनापूर) या सात जणांच्या टोळीला रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजारात विक्री करतांना गुन्हे शाखेने मंगळवारी पकडले. ऑनलाइन आगाऊ २० हजार रुपये पाठविल्यानंतर साध्या वेशातील पोलीस कॉन्स्टेबल विशाल पाटील यांना इंजेक्शन विकले होते. यानंतर सापळा रचून पोलिसांनी एका पाठोपाठ सात आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणांहून पकडले. त्यांच्याकडून पाच रेमडेसिविर इंजेक्शन जप्त केली. या टोळीविरुध्द बेगमपुरा ठाण्यात गुन्हा नोंदवून अटक केली. या टोळीला बुधवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना १ मेपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक सचिन सानप यांनी सांगितले.

अफरोज घ्यायचा नाईट ड्युटी
कोविड सेंटरमधून इंजेक्शन चोरी करणारा मुख्य आरोपी अफरोजखान हा नेहमी रात्रपाळीलाच कामावर जात असे. या कालावधीत डॉक्टर आणि नर्सची नजर चुकवून तो रेमडेसिविर इंजेक्शन चोरी करीत असे. यातील बहुतेक इंजेक्शन तो मृत्यूच्या दाढेत असलेल्या रुग्णाच्या नावे वॉर्डात आलेली अथवा उपचारादरम्यान मयत झालेल्या रुग्णाची शिल्लक राहिलेली इंजेक्शन पळवित असे, असे त्याने पोलिसांना सांगितले.

कमिशन तत्त्वावर आणले एकत्र
रेमडेसिविरची काळ्याबाजारात विक्री करण्यासाठी अफरोजने आरोपी साथीदारांची साखळी तयार केली होती. बऱ्याचदा अन्य आरोपी त्याच्याकडे मागणी नोंदवित आणि अफरोज इंजेक्शन चोरी करून आणून देई. यात प्रत्येकाचा कमिशनचा दर ठरलेला असे. जास्तीत जास्त दराने इंजेक्शन विक्री केल्यास जादा कमिशन तो देई.

Web Title: Shocking! Corona Patients on the verge of death are sold on the black market by smuggling remedivir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.