धक्कादायक ! शहरात अवघ्या बारा दिवसांमध्ये विविध कारणांनी ४०० जणांवर मृत्यूची झडप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 01:21 PM2021-03-13T13:21:03+5:302021-03-13T13:31:43+5:30

Death toll rise in Aurangabad मार्च २०२१ मध्ये कोरोनामुळे मृत्यूचे आकडे आकाशाला आतापासूनच गवसणी घालत आहेत.

Shocking! In just 12 days, 400 people died in the city due to various reasons | धक्कादायक ! शहरात अवघ्या बारा दिवसांमध्ये विविध कारणांनी ४०० जणांवर मृत्यूची झडप

धक्कादायक ! शहरात अवघ्या बारा दिवसांमध्ये विविध कारणांनी ४०० जणांवर मृत्यूची झडप

googlenewsNext
ठळक मुद्देमागील तीन वर्षांच्या तुलनेत मृत्यू तीन हजारांहून जास्तकोरोना इफेक्ट : मार्च २१ मध्ये कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू

- मुजीब देवणीकर

औरंगाबाद : शहरात दरवर्षी वेगवेगळ्या आजारांमुळे तब्बल ७ ते ८ हजार नागरिकांचा मृत्यू होतो. २०२० या वर्षात मृत्यूचा आकडा तब्बल ११ हजारांपर्यंत पोहोचला. मार्च २०२१ ला सुरुवात होताच अवघ्या बारा दिवसांमध्ये जवळपास ४०० नागरिकांचा कोरोनासह विविध आजारांनी मृत्यू झाला. मृत्यूचे हे आकडे शहराच्या चिंतेत प्रचंड भर घालणारे आहेत.

शहरात अनेक नागरिक आजही कोरोना नसल्याप्रमाणे वावरत आहेत. सार्वजनिक ठिकाणी फिरताना कोरोनाच्या कोणत्याही नियमांचे पालन या नागरिकांकडून होत नाही. लॉकडाऊन टाळायचा असेल तर नागरिकांनी स्वतःला शिस्त लावावी असे हजारो वेळेस प्रशासनाने सांगितले. मात्र त्याचा किंचितही परिणाम काही नागरिकांवर झालेला नाही. त्यामुळे शहरात कोरोना राक्षसासारखे रूप धारण करीत आहे. मागील वर्षभरात कोरोना आजाराने तब्बल ९३८ नागरिकांना जीव गमवावा लागला. एवढे सगळं होत असतानाही नागरिक अजूनही जबाबदारी झटकून देत आहेत. शहराने यापूर्वी डेंग्यू, मलेरिया आणि निमोनियामुळे नागरिकांचा मृत्यू होताना पाहिले आहे. कोरोनामुळे मृत्यू होण्याचे सत्र एप्रिल २०२० पासून शहरात सुरू झाले. मार्च २०२१ मध्ये कोरोनामुळे मृत्यूचे आकडे आकाशाला आतापासूनच गवसणी घालत आहेत.

गत ४ वर्षांत मृत्यूचे आकडे
वर्ष - एकूण मृत्यूसंख्या
२०१७ - ७,२१६
२०१८ - ८, २२४
२०१९ - ८, ३५२
२०२० - ११, १६४

२०२० - २१ मध्ये दरमहा मृत्यू
महिना - २०२० - २०२१ - कोरोना मृत्यू
जानेवारी - ७४९ - ७७९ - ८५
फेब्रुवारी - ६७८ - ७०९ - ७१
मार्च - ६७३ - ४०० - ९७ (१२ मार्चपर्यंत)
एप्रिल - ६२१ - ००० - ०६ (२०२०)
मे - ९१५ - ००० - ८१
जून - ११४४ - ००० - २३१
जुलै - १०६८ - ००० - ३१४
ऑगस्ट - ११८६ - ००० - ३५२
सप्टेंबर - १२४८ - ००० - ४३२
ऑक्टोबर - १२४९ - ००० - २५५
नोव्हेंबर - ७९९ - ००० - १०६
डिसेंबर - ८७० - ००० - १८०

Web Title: Shocking! In just 12 days, 400 people died in the city due to various reasons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.