धक्कादायक ! सुदैवाने वाचला डोळा; मांजाने कापला गाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 01:48 PM2021-01-15T13:48:46+5:302021-01-15T13:50:38+5:30

पतंगाच्या मांजामुळे डोळ्याजवळ जखम झाली

Shocking! Luckily the eye survived; Cheeks cut off by the Nylon Manja | धक्कादायक ! सुदैवाने वाचला डोळा; मांजाने कापला गाल

धक्कादायक ! सुदैवाने वाचला डोळा; मांजाने कापला गाल

googlenewsNext

औरंगाबाद : पतंगाच्या मांजामुळे शहानूरमियाँ दर्गा चौकातील एका २७ वर्षीय तरुणाच्या गालावर कापल्याची घटना गुरुवारी घडली. सुदैवाने मोठी जखम झाली नसल्याचे घाटीतील डॉक्टरांनी सांगितले.

सय्यद रिजवान असे या जखमीचे नाव आहे. त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार करण्यात आले. पतंगाच्या मांजामुळे डोळ्याजवळ जखम झाल्याचे त्यांनी घाटीतील डॉक्टरांना सांगितले. याबरोबरच मांजा पकडताना तोल जाऊन पडल्याने १३ वर्षीय अरबाज शेख कदीर याच्या हाताच्या मनगटाला मार लागला. मुलावर घाटीत उपचार सुरू असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

नायलॉन मांजामुळे कबुतराचा मृत्यू
नायलॉन मांजामुळे एका कबुतराचा मृत्यू झाला. रेल्वेस्टेशन रोडवरील एका हॉटेलच्या सुरक्षा भिंतीलगत गुरूवारी दुपारी एक कबूतर मृतावस्थेत आढळले. प्रत्यक्षदर्शीने पशुवैद्यकीय विभागाला माहिती दिली. विभागाच्या पथकाने ते मृत कबूतर प्रयोगशाळेत तपासणीसाठी नेले. तपासणीअंती बर्ड फ्ल्यूने नव्हे तर मांजामुळे सदरील पक्षाचा मृत्यू झाल्याचे डॉ.वल्लभ जोशी यांनी सांगितले.

Web Title: Shocking! Luckily the eye survived; Cheeks cut off by the Nylon Manja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.