धक्कादायक ! वृद्धेला गाठोड्यात बांधून विहिरीत फेकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2020 06:27 PM2020-10-15T18:27:33+5:302020-10-15T18:29:37+5:30

crime news महिला मोलमजुरी करून उपजीविका भागवते असे

Shocking! The old women was tied up and thrown into a well | धक्कादायक ! वृद्धेला गाठोड्यात बांधून विहिरीत फेकले

धक्कादायक ! वृद्धेला गाठोड्यात बांधून विहिरीत फेकले

googlenewsNext
ठळक मुद्देआरोपी पोलिसांच्या ताब्यात आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली

शिऊर : अंतर्गत वादातून शिऊर (ता. वैजापूर) येथे एका ५५ वर्षीय वृद्धेला साडीच्या गाठोड्यात बांधून विहिरीत फेकल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. चंद्रकला परसराम मोरे असे मयत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी शिऊर पोलिसांनी संशयित आरोपी सुभाष अंकुश पवार (३५) यास ताब्यात घेतले असून त्याने खून केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. या घटनेतील त्याचा एक साथीदार फरार झाला आहे.

शिऊरच्या जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात राहणाऱ्या चंद्रकला मोरे मोलमजुरी करून  उपजीविका भागवत होत्या. त्यांचा मृतदेह बाजारतळ परिसरालगत विहिरीतील पाण्यात तरंगत असल्याचे बुधवारी नागरिकांना दिसले.  माहिती मिळताच शिऊर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांनी घटनास्थळी भेट दिली. तरंगत असलेले प्रेत दोरीच्या मदतीने विहिरीतून बाहेर काढले. 

आरोपी व्यसनाधीन
शिऊरच्या चंद्रकला परसारम मोरे यांच्या खून प्रकरणात गावातील सुभाष अंकुश पवार यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या खुनाची त्याने कबुलीसुद्धा दिली. मात्र, सुभाष पवार दारूच्या आहरी गेलेला असून पोलिसांनी बुधवारी त्यास ताब्यात घेतले त्यावेळी तो शुद्धीत नव्हता. त्यामुळे चंद्रकला मोरे यांचा खून नेमका कुठल्या कारणासाठी, तसेच कुणाच्या सांगण्यावरून केला, असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत.

Web Title: Shocking! The old women was tied up and thrown into a well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.