धक्कादायक! घाटी रुग्णालयातील रक्तपेढीत एकाची आत्महत्या
By संतोष हिरेमठ | Published: March 30, 2023 09:38 AM2023-03-30T09:38:44+5:302023-03-30T09:39:04+5:30
मृत व्यक्ती रुग्ण असण्याची शक्यता
छत्रपती संभाजीनगर : घाटी रुग्णालयातील विभागीय रक्तपेढीत एकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी समोर आली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
रक्तपेढीतील कर्मचारी नियमितपणे सकाळी सहा वाजता पोहोचले, तेव्हा हा प्रकार निदर्शनास पडला. याविषयी तात्काळ रुग्णालय प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलिस प्रशासन आणि रुग्णालय शासनाने घटनास्थळी धाव घेतली. हा व्यक्ती कोण आहे, हे नेमके अजून समोर आलेले नाही. मात्र त्याच्या हाताला एन्जोक्यत असल्याचा समोर आलेला आहे. त्यावरून हा व्यक्ती रुग्ण असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अपघात विभागाच्या परिसरात असलेल्या रक्तपेढीत वर्दळ असते. अशा परिस्थितीत आत्महत्येच्या घटनेने रुग्णालयात सर्वत्र खळबळ आली आहे.