धक्कादायक ! मनोरुग्णाची हॉस्पिटलच्या टॉयलेटमध्ये गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 02:20 PM2021-07-09T14:20:19+5:302021-07-09T14:20:59+5:30

Psycho patient commits suicide : एक्झॉस्ट पंख्याला गळ्यातील रुमालाच्या साहाय्याने गळफास घेतला.

Shocking! Psycho patient commits suicide by hanging himself in hospital toilet | धक्कादायक ! मनोरुग्णाची हॉस्पिटलच्या टॉयलेटमध्ये गळफास घेऊन आत्महत्या

धक्कादायक ! मनोरुग्णाची हॉस्पिटलच्या टॉयलेटमध्ये गळफास घेऊन आत्महत्या

googlenewsNext

औरंगाबाद: एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या मनोरुग्णाने टॉयलेटमध्ये एक्झॉस्ट पंख्याला रुमाल बांधून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी 8:30 वाजता समोर आली. याप्रकरणी सिडको ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ( Psycho patient commits suicide by hanging himself in hospital toilet )

रामेश्वर हिम्मतराव काकडे,(52,रा. बोरागांव, जिल्हा बुलढाणा) असे मयत रुग्णाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार रामेश्वर हे गेल्या काही महिन्यापासून मनोरुग्ण झाले होते. नातेवाइकांनी त्यांना 5 जुलै रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास एमजीएम रुग्णालयात दाखल केले होते.  रुग्णालयातील  मनोविकृती शास्त्र विभागाअंतर्गत त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्यासोबत नातेवाईक रुग्णालयात होते. आज सकाळी त्यांनी नातेवाइकांनी आणलेला चहा घेतला. यानंतरही काही वेळाने ते टॉयलेट मध्ये गेले. यावेळी दाराची कडी आतून लावून घेतली नाही. त्यांनी तेथील एक्झॉस्ट पंख्याला गळ्यातील रुमालाच्या साहाय्याने गळफास घेतला.

काही वेळाने दुसाऱ्या एका रुग्णाणे त्या टॉयलेटचे दार लोटले असता रामेश्वर यांनी गळफास घेतल्याचे त्यांना दिसले. यामुळे त्यांनी आरडाओरड केल्याने डाँक्टर, नर्स, सफाई कर्मचारी आणि नातेवाईक यांनी तिकडे धाव घेतली. त्यांच्या गळ्यातील फासाचा रुमाल सोडून अपघात विभागात दाखल करण्यात आले. तोपर्यंत उशीर झाला होता. तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक प्रतिभा आबुज यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला . याप्रकरणी सिडको ठाण्यात अकस्मात मृत्यू ची नोंद करण्यात आली. पोलिस हवालदार पठाण तपास करीत आहेत.

Web Title: Shocking! Psycho patient commits suicide by hanging himself in hospital toilet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.