धक्कादायक! कात्रीने कापायची होती हाताची पट्टी, कापली गेली ६ महिन्याच्या बाळाची करंगळी
By संतोष हिरेमठ | Published: October 26, 2023 04:23 PM2023-10-26T16:23:33+5:302023-10-26T16:26:06+5:30
नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त करीत बेगमपुरा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविल्याचे समजते.
छत्रपती संभाजीनगर : घाटी रुग्णालयात उपचार सुरु असताना एका सहा महिन्याच्या बाळाची करंगळी कापल्या गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
यासंदभार्त अधिक माहिती अशी, न्युमोनिया झाल्यामुळे एका सहा महिन्याच्या बाळाला उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना बाळाला सलाईन लावण्यासाठी हाताल पट्टी बांधण्यात आली होती. बांधलेली पट्टी कात्रीने कापताना परिचारिकेकडून बाळाची करंगळीचा वरील भागच कापला गेला. याप्रकारामुळे नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त करीत बेगमपुरा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविल्याचे समजते.
नांदेड जिल्ह्यातही घडली अशीच घटना
दरम्यान, नांदेड जिल्ह्यातील कंधार येथे देखील दोन दिवसांपूर्वी अशीच घटना घडली होती. घरात नवीन पाहुण्याचे आगमन झाल्याने खुश असलेल्या भुत्ते कुटुंबियाला विचित्र प्रकाराला सामोरे जावे लागले.रूग्णालयात बाळांतपण झाल्यानंतर सुटी मिळाल्याने सात दिवसीय चिमुकल्याच्या हाताची सुई काढण्यास सांगितले. परंतु, सुईची पट्टी निघत नसल्याने कापत असताना चक्क बाळाचा अंगठा कापला गेला. हा धक्कादायक प्रकार कंधार येथील एका खासगी रूग्णालयात घडला. भुत्ते कुटुंबियांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी एकच गोंधळ घातला. दरम्यान,चुकीमुळे जी गोष्ट घडून गेली, ती परत तर येणार नाही म्हणून पुढील खर्चासाठी लागणारी जी मदत आहे, ती डॉक्टरांनी द्यावी, असा तोडगा काढून प्रकरणाचा निपटारा करण्यात आला.