धक्कादायक; सुवर्ण पदक विजेत्या डॉक्टरची मानसिक तणावातून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2020 04:22 PM2020-01-06T16:22:00+5:302020-01-06T16:33:33+5:30

मानसिक तणावातून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे.

Shocking; Suicide of gold medalist winning doctor from Ghati Hospital | धक्कादायक; सुवर्ण पदक विजेत्या डॉक्टरची मानसिक तणावातून आत्महत्या

धक्कादायक; सुवर्ण पदक विजेत्या डॉक्टरची मानसिक तणावातून आत्महत्या

googlenewsNext

औरंगाबाद : शासकीय रुग्णालय घाटीतील मेडिसीन विभागात कार्यरत सहाय्यक प्राध्यापक  डॉ. शशाद्री गौडा (२७) यांनी राहत्या घरी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली. 

शशाद्री हे घाटी रुग्णालयातून एमडी मेडिसीन या विषयात गोल्ड मेडलिस्ट होते. त्यानंतर ते घाटी येथेच सहाय्यक प्राध्यापक म्हणून जूनपासून कार्यरत होते. विभागातील लाडका आणि हुशार डॉक्टर म्हणून ते सर्व परिचित होते. तसेच रुग्णस्नेही डॉक्टर अशी मेडिसीन विभागात त्यांची ओळख होती.

दरम्यान, शशाद्री यांनी मानसिक तणावातून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिसांना त्यांच्या मृतदेहाजवळ सुसाईड नोट मिळाली असून अधिक तपास सुरु आहे. या घटनेने घाटी रुग्णालयात खळबळ उडाली असून डॉक्टर, विद्यार्थी आणि रुग्णांनी अपघात विभागासमोर गर्दी केली आहे.

Web Title: Shocking; Suicide of gold medalist winning doctor from Ghati Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.