‘बटन की गोली’; नशेसाठी झोपेच्या गोळ्यांचा तरुणांकडून वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 01:58 PM2019-09-28T13:58:47+5:302019-09-28T14:03:49+5:30

गोळ्या मिळविण्यासाठी काहीही करण्याची प्रवृत्ती

Shocking! Use of sleeping pills for drugs by young people | ‘बटन की गोली’; नशेसाठी झोपेच्या गोळ्यांचा तरुणांकडून वापर

‘बटन की गोली’; नशेसाठी झोपेच्या गोळ्यांचा तरुणांकडून वापर

googlenewsNext
ठळक मुद्देमानसिक आजारांबरोबर शारीरिक आजारएकाच वेळी १० ते ५० गोळ्यांचे सेवन

- संतोष हिरेमठ 

औरंगाबाद : अमली पदार्थ म्हणून तरुणाई दिवसेंदिवस नशेच्या गोळ्यांच्या आहारी जात आहे. नशेसाठी थेट झोपेच्या गोळ्यांचा वापर होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याच झोपेच्या गोळ्यांची ‘बटन की गोली’ म्हणून सर्रास विक्री केली जात आहे. व्यसन वाढल्यानंतर गोळ्या मिळविण्यासाठी काहीही करण्याची प्रवृत्ती व्यक्तीत तयार होते. शिवाय माानसिक आजारांबरोबर शारीरिक आजारांना तोंड द्यावे लागते, असे मानसोपचारतज्ज्ञांनी सांगितले.

नशेच्या गोळ्यांसाठी पैसे न दिल्याच्या रागातून तिघांनी एक ाचा धारदार चाकूने वार क रू न निर्घृण खून के ल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री पडेगाव परिसरात घडली. गेल्या काही वर्षांत नशेच्या गोळ्यांमुळे तरुणाई गुन्हेगारीकडे वळत असल्याचे अनेक घटनांवरून समोर आले.  घाटीतील मानसोपचार विभागात व्यसनापासून सुटका होण्यासाठी महिन्याकाठी किमान दीडशेवर रुग्ण येतात. यामध्ये दारूसह अनेक गोष्टींच्या व्यसनांचा समावेश असतो. काहींची स्वत:हून व्यसन सोडण्याची तयारी असते, तर काहींना कुटुंबीय बळजबरीने घेऊन आलेले असतात. वाढलेल्या व्यसनामुळे अनेक दुष्परिणाम होत असल्याचे मानसोपचारतज्ज्ञांनी सांगितले.  

गोळी सेवनानंतर काय होते? 
गोळीतील रासायनिक घटकांमळे झोप येते. अनेक आजारांत ते महत्त्वाचे ठरते; परंतु व्यसनापोटी अनेक गोळ्या घेतल्या जातात. त्यातून हळूहळू गोळ्यांची संख्या वाढते. शेवटी मेंदूवर परिणाम करणाऱ्या गोळीची सवय लागते. त्यातून त्याचे व्यसनात रूपांतर होते. या गोळ्यांचे व्यसन वाढते आणि त्याची खरेदी करण्यासाठी पैशांच्या समस्येला तोंड द्यावे लागते. गोळ्या खरेदीसाठी पैसे मिळविण्यासाठी नशेखोर कुटुंबीय, नातेवाईक, मित्रांकडे याचना करतात. पैसे मिळाले नाहीत, तर भांडण, प्रसंगी मारामारी करतात. अनोळखी व्यक्तींना धमकावून, मारहाण करून पैसे लुटण्यास ते घाबरत नाहीत. त्यातून अनेक गैरकृत्ये त्यांच्या हातून घडतात.

एकाच वेळी १० ते ५० गोळ्यांचे सेवन
व्यसनाचे प्रमाण व्यक्तीमध्ये वाढल्यानंतर एकाच वेळी १० ते ५० गोळ्या खाण्याचे प्रकार होतात. असे अनेक रुग्ण यापूर्वी समोर आलेले आहेत. गोळ्यांसोबत किमान दोन ते तीन अमली पदार्थ एकत्र करून सेवन करण्याचा प्रकारही होतो.

काही पानटपऱ्यांवरही विक्री
शहरातील काही पानटपऱ्यांवर या ‘बटन’ गोळीची सर्रास विक्री होत आहे. गोळ्या खाल्ल्यानंतर इतर व्यसन केल्यानंतर येतो तसा कोणताही वास येत नाही. त्यामुळे सर्वसामान्य घरांतील मुलांबरोबर उच्चस्तरातील मुलेही गोळ्यांच्या व्यसनाला बळी पडत आहेत. काही जण चौपट-पाचपट पैसे घेऊन गोळ्यांची विक्री करीत आहेत.  युवा पिढीला या नशेच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी शहरात तपासणी मोहीम राबविण्याची गरज आहे.

व्यसन सुटणे शक्य
झोपेच्या गोळ्यांचा वापर नशेसाठी होत असल्याचे दिसते. या गोळ्या ‘बटन की गोली’ म्हणून ओळखली जाते. ज्याप्रमाणे इतर व्यसनांचे प्रमाण वाढते, त्या प्रकारे अधिक गोळ्या खाऊन नशा केली जाते. गोळ्या सेवन करताना सोबत व्हाईटनरसह अन्य अमली पदार्थ घेण्याचाही प्रकार होतो. झोपेच्या या गोळ्या डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधी दुकानांनी विक्री करता कामा नये.  योग्य वेळी उपचार घेतल्यास व्यसन सुटणे शक्य आहे.
- डॉ. संजय घुगे, मानसोपचारतज्ज्ञ, घाटी

नशेमुळे होणारे मानसिक परिणाम
- चिडचिडेपणा वाढणे.
- सतत अस्वस्थ राहणे.
- कशाची तरी नाहक भीती वाटणे.
- वेगवेगळ्या प्रकारचे भास होणे.
- उदासीनता निर्माण होते.
- नशेमुळे होणारे शारीरिक परिणाम
- सतत हात थरथर कापणे.
- सतत घाम येत राहणे.
- हृदयाचे ठोके वाढणे.
- हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका.
- मेंदूचा झटका येण्याचा धोका.
- लिव्हर, पोटाचे आतडे खराब होणे.
 

Web Title: Shocking! Use of sleeping pills for drugs by young people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.