कन्नड तालुक्यातील अनेक प्रस्थापितांना धक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:04 AM2021-01-19T04:04:26+5:302021-01-19T04:04:26+5:30
कन्नड : तालुक्यातील ८० ग्रामपंचायतीची सोमवारी मतमोजणी झाली. सकाळी ९ वाजेपासून सुरू झालेली मतमोजणी प्रक्रिया सायंकाळी चार वाजेला पुर्ण ...
कन्नड : तालुक्यातील ८० ग्रामपंचायतीची सोमवारी मतमोजणी झाली. सकाळी ९ वाजेपासून सुरू झालेली मतमोजणी प्रक्रिया सायंकाळी चार वाजेला पुर्ण झाली. या निवडणुकीत अनेक गावातील प्रस्थापितांचा पराभव झाल्याचे समोर आले आहे. काही ठिकाणी गड आला पण सिंह गेला अशी अवस्थाही पॅनलप्रमुखांची झाल्याचे दिसले.
जिल्हयाचे लक्ष लागलेल्या पिशोर ग्रामपंचायत निवडणुकीत संजना जाधव यांनी ८ जागावर उमेदवार उभे केले होते. त्यांना अप्रत्यक्ष रित्या आव्हान देत त्यांचा मुलगा आदित्यवर्धन जाधव याने सर्वच म्हणजे १७ जागांवर उमेदवार उभे केले. संजना जाधवांचे समर्थन असलेल्या ८ पैकी २ उमेदवारांना विजय मिळाला. तर त्यांचा मुलगा आदीत्यवर्धन याच्या पॅनलला ४ जागा मिळाल्या. पी.एम. डहाके यांच्या पॅनलला ७ तर राजु मोकासे यांच्या पॅनलला ३ जागा मिळाल्या. एका जागेवर अपक्ष उमेदवाराला विजय मिळाला. हतनुर एस. बी. अकोलकर यांच्या पॅनलला बहुमत मिळाले. नागद ग्रामपंचायत निवडणुकीत उदयसिंग राजपुत यांना धक्का बसला. अंधानेर ग्रामपंचायतीत अशोक दाबके यांना बहुमत. राकाँचे तालुकाध्यक्ष बबनराव बनसोड मुंडवाडीत पराभुत झाले. जेहुर ग्रामपंचायतीत माजी प.स. सदस्य गीताराम पवार, चापानेरमधुन जि.प. सदस्य किशोर पवार हे ग्रामपंचायत ताब्यात ठेवण्यात यशस्वी झाले आहे.टाकळी अंतुर ग्रामपंचायतमध्ये जि.प. सदस्य संदीप सपकाळ यांच्या पॅनलला बहुमत मिळाले. भाजप तालुकाध्यक्ष भगवान कोल्हे यांची पत्नी व माजी सभापती अर्चना कोल्हे पराभुत झाल्या. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अवचित वळवळे यांचा मुलगा व पुतण्या दोघेही पराभुत झाले.