तीर्थपुरीत एक कोटींची विक्रमी तूर खरेदी
By Admin | Published: March 19, 2017 11:36 PM2017-03-19T23:36:32+5:302017-03-19T23:41:27+5:30
तीर्थपुरी : येथील नाफेडच्या केंद्रावर १ कोटी ३७ लाख ३० हजार ९५० रुपयांची तूर खरेदी आतापर्यंत करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
तीर्थपुरी : येथील नाफेडच्या केंद्रावर १ कोटी ३७ लाख ३० हजार ९५० रुपयांची तूर खरेदी आतापर्यंत करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
नाफेडमार्फत तूर खरेदी सुरु करण्याची मागणी जोर धरु लागल्यानंतर याठिकाणी केंद्र सुरु करण्यात आले. त्यासाठी आ. राजेश टोपे आग्रही होते. ९ मार्च ते १८ मार्चदरम्यान या केंद्रावरुन २ हजार ७१९ क्ंिवटल म्हणजे तब्बल १ कोटी ३७ लाख ३० हजार ९५० रुपये किंमतीची खरेदी झाली असून ५०५० रुपये प्रतिक्ंिवटल असा भाव देण्यात आला. सध्या सव्वाशे वाहने उभी आहेत.
सभापती तात्यासाहेब उढाण यांच्यासह नाफेडचे ग्रेडर महिपाल, सचिव यु. एन. काळे, व्यवस्थापक साळवे, केंद्रप्रमुख बोके, भाऊसाहेब बोबडे आदी या केंद्रावर शेतकऱ्यांची तूर खरेदी करताना गैरसोय होऊ नये, यासाठी लक्ष ठेवून आहेत. नाफेड केंद्र सुरू झाल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या रेट्यानंतर येथे नाफेडचे तूर खरेदी सुरू करण्यात आले आहे. या केंद्राला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येते.
गत पंधरा ते वीस दिवसांपासून नाफेड केंद्रावर तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांच्या रांगा वाढल्या आहेत. तीर्थपुरी येथे अतिरिक्त तूर खरेदी सुरू करावे, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. (वार्ताहर)