कृषी दुकानदारांनी पुकारला बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2017 12:21 AM2017-11-03T00:21:38+5:302017-11-03T00:21:45+5:30
विदर्भातील कीटकनाशक फवारणी प्रकरणात केवळ व्यापाºयांना दोषी धरले जात असल्याने याविरुद्ध परभणी जिल्ह्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी २ नोव्हेंबरपासून बंद पुकारला आहे. परभणी शहरातील मोंढा बाजारपेठेतील दुकाने गुरुवारी कडकडीत बंद ठेवण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : विदर्भातील कीटकनाशक फवारणी प्रकरणात केवळ व्यापाºयांना दोषी धरले जात असल्याने याविरुद्ध परभणी जिल्ह्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी २ नोव्हेंबरपासून बंद पुकारला आहे. परभणी शहरातील मोंढा बाजारपेठेतील दुकाने गुरुवारी कडकडीत बंद ठेवण्यात आली.
यवतमाळ जिल्ह्यात कीटकनाशकांची फवारणी करीत असताना मजुरांच्या मृत्यूच्या घटना घडल्या आहेत. या प्रकारास केवळ व्यापाºयांनाच दोषी धरले जात आहे. जी औषधी फवारताना या घटना घडल्या, त्या औषधींना केंद्र शासनाने परवानगी दिली कशी? तसेच फवारणी करताना वापरले जाणारे स्प्रे, आणि फवारणीची पद्धत चुकीची असल्यानेही कीटकनाशकांमुळे मृत्यू झाला असू शकतो. तेव्हा व्यापाºयांना नाहक त्रास देऊ नये, या प्रमुख मागणीसाठी राज्यभरात कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी बंद पुकारला असून परभणी जिल्ह्यातही हा बंद पाळण्यात आला. गुरुवारी परभणीच्या मोंढ्यातील सर्वच्या सर्व दुकाने कडकडीत बंद ठेवण्यात आली. परभणी शहरात दीडशे कृषी निविष्ठा परवानाधारक असून जिल्ह्यात दोन हजाराहून अधिक कृषी निविष्ठा विक्रेते आहेत. या सर्व विक्रेत्यांनी बंदमध्ये सहभाग घेतल्याची माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली. ४ नोव्हेंबरपर्यंत हा बंद पाळला जाणार आहे.