शाळा दुरुस्तीच्या निधीवरून ओरड
By Admin | Published: February 16, 2016 11:31 PM2016-02-16T23:31:14+5:302016-02-16T23:37:10+5:30
हिंगोली : जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या शाळाखोली देखभाल व दुरुस्ती योजनेतील दीड कोटींचा निधी ठरावीक भागातच वितरित केल्याचा आरोप सदस्यांतून केला जात आहे.
हिंगोली : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या शाळाखोली देखभाल व दुरुस्ती योजनेतील दीड कोटींचा निधी ठरावीक भागातच वितरित केल्याचा आरोप सदस्यांतून केला जात आहे.
या विभागाला मिळालेल्या दीड कोटी रुपयांचे नियोजन करण्यास मोठा विलंब केला जात होता. त्यातच अचानक नियोजन करण्यात आले. यामध्ये समितीवरील सदस्यांच्या शिफारसीवरून त्यांनी सांगितलेल्या ठिकाणीच प्रत्येकी बारा लाखांचा निधी दिला. उर्वरित ठिकाणी पदाधिकाऱ्यांनी सांगितलेली कामे झाली. मात्र जिल्ह्यातील इतर भागातही शाळाखोल्या नादुरुस्त आहेत. काही ठिकाणी तर मोडकळीस आलेल्या शाळांमुळे विद्यार्थी झाडाखाली बसत आहेत. एकाच खोलीत दोन वर्ग भरत आहेत. एका ठिकाणी किमान चार लाखांचा निधी देण्याची मुभा आहे. मात्र काही ठिकाणी किरकोळ निधीतही दुरुस्तीचे काम भागू शकते. इतर जवळपास ३५ सदस्यांच्या शिफारशीवरून एवढा निधी देण्याचेही औदार्य दाखविले जात नसल्याचा आरोप आहे.(वार्ताहर)