रांजणगावच्या विद्यार्थ्यांचे श्रमदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 00:05 IST2019-04-18T00:05:51+5:302019-04-18T00:05:57+5:30
न्यू शहीद भगतसिंह विद्यालयाच्या स्काऊट गाईडचे विद्यार्थी व शिक्षकांनी वैजापुरातील नायगव्हाण येथे बंधारा उभारण्यासाठी श्रमदान केले.

रांजणगावच्या विद्यार्थ्यांचे श्रमदान
वाळूज महानगर : रांजणगाव शेणपुंजी येथील न्यू शहीद भगतसिंह विद्यालयाच्या स्काऊट गाईडचे विद्यार्थी व शिक्षकांनी वैजापुरातील नायगव्हाण येथे बंधारा उभारण्यासाठी श्रमदान केले.
पाणी फाऊडेंशनतर्फे आयोजित वॉटर कप स्पर्धेत समावेश व्हावा, यासाठी ग्रामस्थांचे प्रयत्न सुरु आहे. सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे सर्वत्र भीषण पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. यंदा पावसाळ्यात पाणी वाहुन जाऊ नये, यासाठी ग्रामस्थांनी श्रमदानातून बंधारा बांधण्याचा निर्णय घेतला आहे.
पाणी बचतीसाठी आपलाही खारीचा वाटा रहावा, यासाठी रांजणगावच्या न्यू शहीद भगतसिंह स्काऊट गाईड पथकाने मंगळवारी नायगव्हाणला भेट देऊन बंधारा बांधण्यासाठी श्रमदान केले. या उपक्रमात मुख्याध्यापिका भारती साळुंके, संस्थेचे सचिव हर्षित साळुंके, लोणी गावचे सुभाष साळुंके तसेच शाळेचे शिक्षक व स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी बंधारा बांधण्यासाठी श्रमदान केले.