सह्याद्री वृक्ष बँकेतर्फे श्रमदान शिबीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:02 AM2021-02-14T04:02:21+5:302021-02-14T04:02:21+5:30

------------------------------- टँकरद्वारे दुभाजकांची साफसफाई वाळूज महानगर : वाळूज ते गोलवाडी फाट्यापर्यंत रस्त्यावरील दुभाजकांच्या साफ-सफाईचे काम हाती घेण्यात आले आहे. ...

Shramdan Shibir by Sahyadri Tree Bank | सह्याद्री वृक्ष बँकेतर्फे श्रमदान शिबीर

सह्याद्री वृक्ष बँकेतर्फे श्रमदान शिबीर

googlenewsNext

-------------------------------

टँकरद्वारे दुभाजकांची साफसफाई

वाळूज महानगर : वाळूज ते गोलवाडी फाट्यापर्यंत रस्त्यावरील दुभाजकांच्या साफ-सफाईचे काम हाती घेण्यात आले आहे. पथकर वसुल करणाºया कंपनीकडून या मार्गावरील दुभाजक टँकरच्या पाण्याचे स्वच्छ केले जात असून, दुभाजकावरील केर-कचरा व गवत काढण्यात येत आहे. साफ-सफाईचे काम पुर्ण झाल्यानंतर दुभाजकाला रंगरंगोटी करण्यात येणार आहे.

---------------------------------------

साजापूर फाट्यावर दिशादर्शक फलक लावा

वाळूज महानगर : साजापूर फाट्यावरील वळण रस्त्यावर दिशादर्शक फलक नसल्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. उद्योगनगरीतील अनेक कंपन्या या रस्त्यावर असल्याने वाहनांची सारखी वर्दळ असते. या फाट्यावरुन वळण घेत असतांना दिशा-दर्शक फलक नसल्याने अपघाताच्या घटनाही वाढल्या आहे. या ठिकाणी दिशा-दर्शक फलक लावल्यास अपघाताच्या घटनेला आळा बसण्याची शक्यता वाहनधारकातुन केली जात आहे.

--------------------

कामगार चौकात खड्ड्यामुळे वाहनधारक त्रस्त

वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसीतील कामगार चौकात मोठ-मोठे खड्डे पडल्यामुळे वाहनधारक त्रस्त झाले आहे. या चौकात ठिक-ठिकाणी धोकादायक खड्डे पडले आहे. रात्रीच्यावेळी वाहनधारकांना खड्डे दिसत नसल्याने खड्यात वाहने आदळून वाहनाचे नुकसान होत आहे. या भागातील धोकादायक खड्डे बुजविण्याची मागणी त्रस्त वाहनधारकातुन केली जात आहे.

---------------------

जोगेश्वरीत गटारी तुंबल्या

वाळूज महानगर : जोगेश्वरीतील न्यु आंबेडकरनगरात गटारी तुंबल्या असून सांडपाणी उघड्यावरुन वाहत आहे. या वसाहतीत नाल्याची स्वच्छता केली जात नसल्याने केर-कचºयाचे गटारी भरल्या आहे. घाण पाणी रस्त्यावरुन वाहत असल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरत असून भांडणाचे प्रकारही वाढले आहे. या भागातील गटार नाल्याची स्वच्छता करण्याची मागणी नागरिकातुन होत आहे.

----------------------------

Web Title: Shramdan Shibir by Sahyadri Tree Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.