श्रेयस निर्वळची आशियाई ट्रायथलॉन स्पर्धेसाठी निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2018 12:23 AM2018-05-01T00:23:56+5:302018-05-01T00:24:44+5:30
हाँगकाँग येथे ४ ते ६ मेदरम्यान होणाऱ्या आशियाई ज्युनिअर ट्रायथलॉन स्पर्धेसाठी औरंगाबादच्या श्रेयस निर्वळ याची भारतीय संघात निवड झाली आहे. आशियाई स्पर्धेत १४ देश सहभागी होत आहेत. आशियाई स्पर्धेत सहभागी होणाºया भारतीय संघात श्रेयस निर्वळ (औरंगाबाद), अनुजा उगले (नाशिक), रॉबिनसिंग (राजस्थान), मोनिका नागपुरे (गुजरात) यांचा समावेश आहे. संघासोबत प्रशिक्षक म्हणून मुंबईचे डॉ. दयानंद कुमार यांची निवड करण्यात आली आहे.
औरंगाबाद : हाँगकाँग येथे ४ ते ६ मेदरम्यान होणाऱ्या आशियाई ज्युनिअर ट्रायथलॉन स्पर्धेसाठी औरंगाबादच्या श्रेयस निर्वळ याची भारतीय संघात निवड झाली आहे. आशियाई स्पर्धेत १४ देश सहभागी होत आहेत.
आशियाई स्पर्धेत सहभागी होणाºया भारतीय संघात श्रेयस निर्वळ (औरंगाबाद), अनुजा उगले (नाशिक), रॉबिनसिंग (राजस्थान), मोनिका नागपुरे (गुजरात) यांचा समावेश आहे. संघासोबत प्रशिक्षक म्हणून मुंबईचे डॉ. दयानंद कुमार यांची निवड करण्यात आली आहे.
आशियाई ट्रायथलॉन स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणारा श्रेयस निर्वळ हा पहिला औरंगाबादचा खेळाडू आहे. या स्पर्धेत श्रेयस हा ७५0 मीटर जलतरण, १९.२५ कि. मी. सायकलिंग व ५ कि. मी. रनिंग अशा प्रकारात देशाचे प्रतिनिधित्व करणार आहे. याआधी श्रेयसने गतवर्षी राज्यस्तरीय स्पर्धेत रौप्य आणि राष्ट्रीय स्पर्धेत कास्यपदक जिंकले आहे. याच वर्षी भारतीय संघाच्या शिबिरासाठीदेखील त्याची निवड झाली आहे. या वर्षी त्याने राज्यस्तरीय स्पर्धेत कास्यपदक जिंकले होते. या स्पर्धेनिमित्त घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत औरंगाबाद जिल्हा ट्रायथलॉन संघटनेचे अध्यक्ष आ. अतुल सावे यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला. या वेळी सायकल ट्रॅक उभारण्याचा मानस सावे यांनी व्यक्त केला. त्याचप्रमाणे राज्य संघटनेचे कोषाध्यक्ष अभय देशमुख यांनी औरंगाबाद शहरात रनिंग, स्विमिंग आणि सायकलिंग अशा तिन्हींची एकाच जागी सरावासाठी व्यवस्था होण्याची आशा व्यक्त केली. या प्रसंगी औरंगाबाद जिल्हा आॅलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष पंकज भारसाखळे यांनी श्रेयस निर्वळ याला स्पर्धेसाठी आर्थिक साह्य केले. या वेळी जिल्हा संघटनेचे सचिव डॉ. संदीप जगताप, प्रदीप खांड्रे, अशोक काळे, अंकुशपालसिंग पाल, नामदेव सोनवणे, संदीप चव्हाण, सीमा देशमुख, मीनाक्षी यादव, योगेश पालकर, श्रीनिवास मोतियळे, चरणजितसिंग संघा आदी उपस्थित होते.