श्री कालिंका देवी यात्रोत्सव
By Admin | Published: March 25, 2017 11:15 PM2017-03-25T23:15:25+5:302017-03-25T23:36:28+5:30
तळणी : मंठा तालुक्यातील हेलस येथील प्राचीन श्री. कालिंका देवी मंदिर संस्थानतर्फे ३० मार्चपासून श्री. कालिंका देवीच्या ३४ व्या वार्षिक यात्रौत्सवास सुरूवात होत आहे
तळणी : मंठा तालुक्यातील हेलस येथील प्राचीन श्री. कालिंका देवी मंदिर संस्थानतर्फे ३० मार्चपासून श्री. कालिंका देवीच्या ३४ व्या वार्षिक यात्रौत्सवास सुरूवात होत आहे. यानिमित्त कीर्तन, भजन, प्रवचन आदी विविध धार्मिक व अध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवारपर्यंत उत्सव चालणार आहे. उत्सवानिमित्त दररोज सकाळी साडे सात ते साडे नऊ या कालावधीत रेखाबाई बारसकर व आबासाहेब शिलवंत यांच्या पौराहित्यात श्री कालिंका देवीस चढाव, अभिषेक, महापूजा, आरती व सायंकांळी सात वाजता आरती व छबिना आदी कार्यक्रम होतील.
गुरूवारी रात्री नऊ वाजता समाजभूषण माणिक महाराज मांगुळकर (दहेगाव ता.जिंतूर ) यांचे कीर्तन होणर आहे. शुक्र वारी वारकरी शिक्षण संस्थेचे रामेश्वर महाराज यांचे कीर्तन तर शनिवारी सकाळी अकरा वाजता देविदास महाराज ढोके यांचे ज्ञानेश्वरीवर प्रवचन सेवा होणार आहे.
उत्सवाच्या यशस्वीतेसाठी महिला मंडळ, नवयुवक मंडळ व भक्तगण पुढाकार घेत आहेत. उत्सवात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थानचे अध्यक्ष सतीश तळणीकर, उपाध्यक्ष सुभाष दहीभाते, बालासाहेब दहीभाते, सचिव बाबासाहेब हेलसकर यांच्यासह संस्थानच्या सदस्यांनी केले आहे. (वार्ताहर)