लोकमत रक्तदान महायज्ञच्या राज्यभर जनजागृतीमध्ये श्री ओम स्टीलचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:04 AM2021-07-03T04:04:21+5:302021-07-03T04:04:21+5:30
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा, औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, श्री ओम स्टीलचे मुख्य ...
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा, औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, श्री ओम स्टीलचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन भारुका, श्री ओम स्टीलचे ब्रँड मॅनेजर प्रदीप खैरे यांच्या हस्ते या उपक्रमाचा लोकार्पण करण्यात आला.
लोकमतच्या या महायज्ञात आमचा सहभाग असल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. लोकमत नेहमीच समाजोपयोगी कार्यक्रमात अग्रेसर राहिला असून, याचेच औचित्य साधून श्री ओम स्टीलने 'स्टील ऑन व्हील' या ब्रँडिंग व्हॅनच्या माध्यमातून दिनांक २ ते १५ जुलैपर्यंत महाराष्ट्रभर या मोहिमेची जनजागृती करण्याचा निर्धार केला असल्याची माहिती नितीन भारुका यांनी दिली. या ‘स्टील ऑन व्हील’मध्ये स्टीलचे उत्पादने कसे होतेे, त्यासाठी वापरात येणारे तंत्रज्ञान, गुणवत्ता आणि टिकाऊपणा याबाबतची माहिती दिली जाते. कोणत्या बांधकामाला कोणते स्टील किती प्रमाणात वापरावे, यासंबंधीही माहिती दिली जाते. पन्नास वर्षांपूर्वी स्वर्गीय शांतीलाल पित्ती यांनी जालनामध्ये एसआरजे उद्योग समुहाची मुहूर्तमेढ रोवली होती.
कॅप्शन..
श्री ओम स्टीलच्या 'स्टील ऑन व्हील' या ब्रँडिंग व्हॅनच्या लोकार्पणप्रसंगी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा, औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, श्री ओम स्टीलचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन भारुका, औरंगाबाद महानगर पालिकेचे आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय, घाटी रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. कानन येळीकर, विभागीय रक्त संक्रमण अधिकारी डॉ. सविता सोनवणे आदी.