श्रीक्षेत्र धूपखेडा येथे साईचरित्र पारायण, भागवत कथेस प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 01:27 AM2018-02-22T01:27:55+5:302018-02-22T01:28:09+5:30
श्रीक्षेत्र धूपखेडा येथे श्री साईबाबा सेवा साधनाश्रमात २१ फेब्रुवारीपासून स्वामी बलदेवजी भारती यांच्या मार्गदर्शनाखाली व साईभक्तांच्या सहकार्याने श्रीमद्भागवत कथा, अखंड हरिनाम सप्ताह, साईचरित्र पारायण सोहळ्यास ध्वजारोहण व दीप प्रज्वलनाने प्रारंभ करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
बिडकीन : श्रीक्षेत्र धूपखेडा येथे श्री साईबाबा सेवा साधनाश्रमात २१ फेब्रुवारीपासून स्वामी बलदेवजी भारती यांच्या मार्गदर्शनाखाली व साईभक्तांच्या सहकार्याने श्रीमद्भागवत कथा, अखंड हरिनाम सप्ताह, साईचरित्र पारायण सोहळ्यास ध्वजारोहण व दीप प्रज्वलनाने प्रारंभ करण्यात आला.
यावेळी स्वामी बलदेवजी भारती, सहकाररत्न, अंबादास मानकापे पाटील, प्रधान आयकर आयुक्त शिवदयाल श्रीवास्तव, सुनील इंगळे पाटील, साई प्रेरणा मंदिराचे रवींद्र पाटील शेळके, साईशाहीर ह.भ.प. सुनील वाघचौरे, अशोक कमलपाल यांची प्रमुख उपस्थिती होती.
२१ ते २७ फेब्रुवारीपर्यंत दररोज सकाळी ८ ते १२ ह.भ.प.कैलास महाराज गुरव व ह.भ.प. सुनील महाराज वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली साईसचरित्र पारायण होणार आहे. दुपारी २ ते ५ साध्वी सोनाली दिदी (चकलांबा) यांच्या अमृतवाणीतून संगीतमय श्रीमद् भागवत कथा होणार आहे. रात्री ८ ते १० साई हरिकीर्तन होणार आहे. त्यात ह.भ.प. सुनीताताई ढोले, ह.भ.प. भक्तीताई वैद्य, ह.भ.प.अमृताताई देशपांडे, ह.भ.प. दुर्गाताई आपशिंदे, ह.भ.प. प्रतिक्षाताई करांडे, ह.भ.प. मनीषाताई बिडाईत, ह.भ.प. दुर्गाताई पोकळे यांचे कीर्तन होणार आहे. २८ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते १२ काल्याचे कीर्तन व सामाजिककार्यात अग्रेसर असणाºया साईभक्त व प्रमुख अतिथींचा सत्कार श्री साईबाबा सेवा साधनाश्रमाच्या वतीने करण्यात येणार आहे. महाप्रसाद व मोफत कर्करोग निदान शिबीर राहुरीचे स्वप्नील माने व डॉ. वैभव देवगिरीकर यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. या धार्मिक कार्यक्रम व आरोग्य शिबिराचा पंचक्रोशीतील भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री साईबाबा सेवा साधनाश्रमाच्या वतीने करण्यात आले आहे. कार्यक्रमासाठी अशोक कमलपाल, श्रीधर देवढे, रवींद्र कारके, दिनेश गायकवाड, राजू गायकवाड, संतोष खणसे, सुदाम चव्हाण, कराळे मिस्त्री, सिद्धेश्वर भालेकर, विजय खराडकर आदींसह साईभक्त परिश्रम घेत आहेत.