सेतू सुुविधा केंद्रावर उडाली झुंबड
By Admin | Published: May 28, 2014 01:11 AM2014-05-28T01:11:32+5:302014-05-28T01:16:15+5:30
औरंगाबाद : शाळा-महाविद्यालये सुरू होण्याच्या आधी विविध प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू सुविधा केंद्रात विद्यार्थ्यांची झुंबड उडत आहे.
औरंगाबाद : शाळा-महाविद्यालये सुरू होण्याच्या आधी विविध प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू सुविधा केंद्रात विद्यार्थ्यांची झुंबड उडत आहे. प्र्रमाणपत्रांसाठी दररोज सुमारे अडीच हजारांहून अधिक अर्ज येत आहेत. ही गर्दी लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी सेतू सुविधा केंद्राची वेळ दोन तासांनी वाढविण्यात आली आहे. आता सकाळी ८ वाजेपासून सेतू सुविधा केंद्राचे काम सुरू होत आहे. जून महिन्यात शाळा-महाविद्यालये सुरू होत आहेत. त्याआधी प्रवेशासाठी आवश्यक प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांनी तयारी चालविली आहे. त्याचाच भाग म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू सुविधा केंद्रात विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे. मागील आठवडाभरापासून रहिवासी, उत्पन्न, जात प्रमाणपत्र, नॉन क्रीमिलेअर, राष्ट्रीयत्व, ३० टक्के महिला आरक्षण, भूमिहीन आदी प्रमाणपत्रांसाठी मोठ्या संख्येने अर्ज केले जात आहेत. त्यामुळे सेतूवरील ताण वाढला आहे. सेतू सुविधा केंद्राच्या संचालकांनी दिलेल्या माहितीनुसार आठवडाभरापूर्वीपर्यंत रोज सुमारे आठशे ते हजार अर्ज येत होते. आता ही संख्या अडीच ते तीन हजारावर पोहोचली आहे. प्रशासनानेही विद्यार्थ्यांची गर्दी लक्षात घेऊन तातडीने प्रमाणपत्र देण्यासाठी अतिरिक्त अधिकार्यांची नियुक्ती केली आहे. स्वाक्षरी करण्यासाठी सेतू सुविधा केंद्रात नायब तहसीलदार सदाशिव पंडुरे यांच्यासह दोन पेशकारांची पूर्णवेळ नियुक्ती केली आहे. याशिवाय जातप्रमाणपत्रांवर स्वाक्षरी करण्याची जबाबदारी तीन उपजिल्हाधिकार्यांकडे सोपविली आहे. तसेच अधिवास प्रमाणपत्रासाठीही स्वतंत्र तहसीलदार नियुक्त करण्यात आले आहेत.