श्रीराम राज्याभिषकाने ‘रामलीला’ची सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 21:03 IST2018-10-20T21:01:25+5:302018-10-20T21:03:30+5:30
वाळूज महानगर : बजाजनगरात आठवडाभरापासून सुरूअसलेल्या ‘रामलीला’ची शुक्रवारी प्रभू श्रीराम राज्याभिषकाने सांगता करण्यात आली. विजया दशमीनिमित्त येथील रामलीला मैदानावर ...

श्रीराम राज्याभिषकाने ‘रामलीला’ची सांगता
वाळूज महानगर : बजाजनगरात आठवडाभरापासून सुरूअसलेल्या ‘रामलीला’ची शुक्रवारी प्रभू श्रीराम राज्याभिषकाने सांगता करण्यात आली.
विजया दशमीनिमित्त येथील रामलीला मैदानावर हिंदी सांस्कृतिक कला मंचतर्फे रामलीला कार्यक्रम घेण्यात आला.
१२ आॅक्टोबरपासून सुरू झालेल्या रामलीला कार्यक्रमात उत्तर भारतीय कलावंताकडून नाटिका रूपात रामायणातील प्रभू रामचंद्र यांच्या जीवनावर आधारित अहिल्या उद्धार, गंगा अवतरण, नगर दर्शन, फुलवारी, धनुष्य यज्ञ, वणासूर-रावण संवाद, प्रभू रामचंद्र-सीता विवाह, रामाचा वनवास, सीता अपहरण, राम-भरत भेट, रावण वध आदी प्रसंगाचे उत्तम सादरीकरण करण्यात आले.
गुरुवारी रावणदहन झाल्यानंतर शुक्रवारी रामलीला उत्सव समितीचे अध्यक्ष आर. पी. सिंह व सचिव नरेंद्रसिंह यादव यांच्या हस्ते भगवान राम व माता सीता यांची आरती करून श्रीराम राज्याभिषेकाने ‘रामलीला’ची सांगता करण्यात आली.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थापक अध्यक्ष आर. के. सिंग, जे.पी. सिंग, कैलास यादव, राजेश सिंग, रामजनम सिंग, भूपेंद्र सिंग परिहार, राघवेंद्र सिंग, प्रदीप सिंग, अकवाल सिंग, अमोघ प्रजापती, राहुल सिंग, बाबा तिवारी, पवन सिंग, राघवेंदर सिंग आदींनी परिश्रम घेतले.