राज्यस्तरीय जिम्नॅस्टिक स्पर्धेत श्रीरंगला डबल गोल्डन धमाका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 12:48 AM2018-03-01T00:48:17+5:302018-03-01T00:48:33+5:30
डोंबिविली येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय जिम्नॅस्टिक स्पर्धेत टंबलिंग, ट्रॅम्पोलिंग प्रकारात औरंगाबादच्या साईच्या पश्चिम विभागीय केंद्रातील खेळाडू श्रीरंग लोखंडे याने जबरदस्त कामगिरी करीत डबल गोल्डन धमाका केला आहे. याच स्पर्धेत शुभम तांबे यानेदेखील आपला ठसा उमटवताना कास्यपदक जिंकले आहे.
औरंगाबाद : डोंबिविली येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय जिम्नॅस्टिक स्पर्धेत टंबलिंग, ट्रॅम्पोलिंग प्रकारात औरंगाबादच्या साईच्या पश्चिम विभागीय केंद्रातील खेळाडू श्रीरंग लोखंडे याने जबरदस्त कामगिरी करीत डबल गोल्डन धमाका केला आहे. याच स्पर्धेत शुभम तांबे यानेदेखील आपला ठसा उमटवताना कास्यपदक जिंकले आहे.
राज्य संघटनेतर्फे आयोजित या स्पर्धेत श्रीरंग लोखंडे याने ट्रॅम्पोलिंग प्रकारात वैयक्तिक आणि सांघिक अशा दोन सुवर्णपदकांची कमाई केली. त्याने वैयक्तिक प्रकारात ३४.८, तर सांघिक ९९.९0 गुण नोंदवले. वरिष्ठ गटात शुभम तांबेला १९.५0 गुणांसह तिसºया क्रमांकावर समाधान मानावे लागले. दोन सुवर्णपदकांची कमाई करणारा श्रीरंग लोखंडे हा होलीक्रॉस शाळेत इयत्ता सातवीत आहे. श्रीरंग व शुभम या दोघांनाही साईच्या पश्चिम विभागीय केंद्रातील प्रशिक्षक रामकृष्ण लोखंडे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या यशाबद्दल साईच्या पश्चिम विभागीय केंद्राचे उपसंचालक वीरेंद्र भांडारकर, प्रशिक्षक अजितसिंग राठोड, पिंकी देब, राज्य संघटनेचे सचिव व आंतरराष्ट्रीय पंच मकरंद जोशी, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष संकर्षण जोशी, सचिव सागर कुलकर्णी यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.