श्रुतिका अग्रवालची मुंबई ते गोवा सायकल मोहीम फत्ते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 12:25 AM2018-02-09T00:25:11+5:302018-02-09T00:25:31+5:30
औरंगाबाद येथील महिला सायकलपटू श्रुतिका अग्रवाल हिने अत्यंत खडतर अशी मुंबई ते गोवा ही ५२0 कि. मी. अंतराची सायकल मोहीम यशस्वीपणे फत्ते केली. ही मोहीम तिने १२ दिवसांत पूर्ण केली.
औरंगाबाद : औरंगाबाद येथील महिला सायकलपटू श्रुतिका अग्रवाल हिने अत्यंत खडतर अशी मुंबई ते गोवा ही ५२0 कि. मी. अंतराची सायकल मोहीम यशस्वीपणे फत्ते केली. ही मोहीम तिने १२ दिवसांत पूर्ण केली. या मोहिमेची सुरुवात श्रुतिका अग्रवाल हिने मुंबईच्या गेट वे आॅफ इंडिया येथून सकाळी ७.३0 वाजता केली. या मोहिमेअंतर्गत तिने मांडवा ते मुरुड, मुरुड ते हरिहरेश्वर अशा घाटातून तिने सायकल चालवली. दररोज सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी ५0 कि. मी. अंतर आपण पार करीत असल्याचे तिने सांगितले.
तिने या मोहिमेसाठी औरंगाबाद ते जालना, औरंगाबाद ते दौलताबाद, म्हैसमाळ अशी सायकल चालवून दोन महिने कसून सराव केला होता. औरंगाबाद येथील सायकलपटू समीर केळकर व नताशा जरीन यांच्यामुळे फिटनेसची आवड निर्माण झाली. त्यांच्याकडून
सायकल चालवण्याची आपण प्रेरणा घेतली. या प्रेरणेमुळेच आपली मोहीम फत्ते झाली. इंटेरिअर डिझायनर असणाºया ३१ वर्षीय श्रुतिका अग्रवाल हिचे आता १ हजार कि. मी. सायकल चालवण्याचे लक्ष्य आहे.