मुडैश्वर मंदिरात शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:04 AM2021-03-13T04:04:52+5:302021-03-13T04:04:52+5:30
केळगाव : महाशिवरात्रीनिमित्त भोलेच्या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते; परंतु यंदा कोरोनामुळे धार्मिक स्थळे बंद असून, मुडैश्वर मंदिरदेखील बंद ...
केळगाव : महाशिवरात्रीनिमित्त भोलेच्या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते; परंतु यंदा कोरोनामुळे धार्मिक स्थळे बंद असून, मुडैश्वर मंदिरदेखील बंद करण्यात आले होते. त्यामुळे गुरुवारी मंदिर परिसरात सर्वत्र शुकशुकाट दिसून आला.
कोरोनामुळे पान, फूल, बेलपत्र, नारळ विक्री करणाऱ्यांचा रोजगार हिरावला गेला आहे. अजिंठा डोंगररांगेत मुडैश्वर हे हेमाडपंथी महादेव मंदिर आहे. या मंदिराला बाहेरून प्रदक्षिणा मारता येत नाही. स्थापत्य कलेचा उत्तम नमुना म्हणून या मंदिराकडे पाहिले जाते. केळगावजवळील डोंगरमाथ्यावर प्रभू रामचंद्र यांच्या चरण स्पर्शाने पावन झालेले मुडैश्वर महादेव मंदिर आहे, अशी आख्यायिका येथे सांगितली जाते. त्यामुळे या मंदिरात दर्शनासाठी भाविक मोठी गर्दी करतात. त्यासाठी पोलिसांकडून बंदोबस्त लावण्यात आलेला होता, तर परिसरातील भाविकांनी घरोघरीच महादेवाची पूजा केल्याचे दिसून आले.
---
फोटो : श्री क्षेत्र मुडैश्वर दरवाजा बंद करण्यात आला आहे.