संस्थेच्या उपद्व्यापाने सिडकोत उडाली खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 01:06 AM2017-08-22T01:06:59+5:302017-08-22T01:06:59+5:30

सिडको एमआयडीसीमधील कलाग्राम रोडवर दोन हजार आणि पाचशे रुपयांच्या नव्या नोटा फेकण्यात आल्याने सोमवारी या भागात एकच खळबळ उडाली. शेकडो नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. नोटांचा ढिगार नकली असल्याचे पाहून अनेकांचा हिरमोड झाला

Siddhakat Shastriyapachaya Siddakataya Ujali Sublimation | संस्थेच्या उपद्व्यापाने सिडकोत उडाली खळबळ

संस्थेच्या उपद्व्यापाने सिडकोत उडाली खळबळ

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : सिडको एमआयडीसीमधील कलाग्राम रोडवर दोन हजार आणि पाचशे रुपयांच्या नव्या नोटा फेकण्यात आल्याने सोमवारी या भागात एकच खळबळ उडाली. शेकडो नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. नोटांचा ढिगार नकली असल्याचे पाहून अनेकांचा हिरमोड झाला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनाही घटनास्थळ गाठावे लागले.
सिडकोतील प्रोझोन मॉलकडून कलाग्रामकडे जाणाºया रस्त्यावर हजारोंच्या संख्येने चलनातील दोन हजार आणि पाचशे रुपयांच्या नव्या कोºया नोटा सोमवारी सकाळी फेकण्यात आल्या. या घटनेची माहिती परिसरात वाºयासारखी पसरली. प्रत्येकजण या रस्त्यावर धाव घेत होता. एमआयडीसीत रोजंदारीवर काम करणाºयांपासून ते कारने कंपनीत जाणाºया व्यक्तींपर्यंत अनेकांनी धाव घेतली. प्रत्येक जण नोटा उचलून पाहत आणि फेकून देत होता. या सर्व नोटा चलनातील नव्या दोन हजार आणि पाचशे रुपयांप्रमाणेच हुबेहुब दिसत होत्या. मात्र त्या मनोरंजन बँकेच्या होत्या. या नकली नोटा एका संस्थेने त्यांच्या कार्यक्रमासाठी छापून घेतल्या होत्या. त्यांचा कार्यक्रम संपल्यांनतर नोटांची बंडले कलाग्रामजवळ फेकली.

Web Title: Siddhakat Shastriyapachaya Siddakataya Ujali Sublimation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.