धोत्रा येथील सिद्धेश्वर देवस्थानाला ‘ब’ वर्ग दर्जा प्राप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:06 AM2021-02-23T04:06:19+5:302021-02-23T04:06:19+5:30
सिल्लोड : तालुक्यातील आराध्य दैवत सिद्धेश्वर महाराज संस्थान धोत्रा व पिंपळगाव पेठ येथील प्रसिद्ध देवस्थान श्री सायंबा महाराज संस्थान ...
सिल्लोड : तालुक्यातील आराध्य दैवत सिद्धेश्वर महाराज संस्थान धोत्रा व पिंपळगाव पेठ येथील प्रसिद्ध देवस्थान श्री सायंबा महाराज संस्थान या दोन्ही तीर्थक्षेत्रांना ‘ब’ तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त झाला आहे. यामुळे विकासासाठी येथे आता दोन कोटी रुपयांचा निधी प्राप्त होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत सविस्तर विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या असल्याची माहिती महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.
पिंपळगाव पेठ येथे अब्दुल सत्तार यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला. तालुक्यातील धोत्रा हे प्रसिद्ध देवस्थान असून, संस्थानला मोठ्या प्रमाणावर यात्रा महोत्सवाची परंपरा लाभलेली आहे. धोत्रा, पिंपळगाव पेठ येथील या तीर्थक्षेत्रास ‘क’ वर्गाऐवजी ‘ब’ वर्गाचा दर्जा मिळावा यासाठी अब्दुल सत्तार यांनी पाठपुरावा केला असून, त्याला यश मिळाले आहे. ब दर्जा मिळाल्याने बाहेरून आलेल्या भाविकांसाठी भक्त निवास, नवसपूर्तीसाठी किचन शेड, पूजेसाठी शेड, रस्त्यांचा विकास, आदी विकास होईल. सोयगाव तालुक्यातील भैरवनाथ देवस्थान, मनुदेवी संस्थान बोरमाळ तांडा, तसेच सिल्लोड तालुक्यातील बलदेवदास महाराज देवस्थान, वरुड पिंप्री, यासह मुर्डेश्वर, इंद्रगढी, आमसरी या देवस्थानांच्या विकासासाठीही प्रयत्न करीत असल्याचे अब्दुल सत्तार यांनी सांगितले. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख देविदास लोखंडे, डॉ. संजय जामकर, कृउबाचे सभापती अर्जुन पा. गाढे, उपसभापती नंदकिशोर सहारे, हनिफ मुलतानी यांच्यासह सुभाष लोणकर, विजय भागवत, शिवाजी कोके, हनुमंत जगताप, अप्पा भोसले, नय्यू बेग मिर्झा, दादाराव भोसले, आदींची उपस्थिती होती.
फोटो कॅप्शन : पिंपळगाव पेठ येथील सायंबा महाराज देवस्थानाला ‘ब’ वर्ग दर्जा मिळाल्याने राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे ग्रामस्थांनी स्वागत केले.
220221\img_20210222_175459_365_1.jpg
पिंपळगांव पेठ येथील सायंबा महाराज देवस्थानाला ब दर्जा मिळाल्याने राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे ग्रामस्थांनी स्वागत केले.