सिडकोत श्रमदानातून जगविली जाताहेत झाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2019 10:21 PM2019-02-03T22:21:51+5:302019-02-03T22:22:10+5:30
दररोज स्वयंस्फूर्तीने श्रमदान करून झाडे जगविली जात आहेत.
वाळूज महानगर : सिडकोवाळूज महानगरातील रहिवाशांनी पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घेतला आहे. लागवड केलेले वृक्ष जळून जाऊन नये म्हणून अनेक ठिकाणी स्वखर्च व लोकवर्गणीतून ठिबकची व्यवस्था केली आहे. दररोज स्वयंस्फूर्तीने श्रमदान करून झाडे जगविली जात आहेत.
सिडको प्रशासनाच्या हरित सिडको स्वच्छ सिडको या संकल्पनेतून परिसरात जवळपास ८ हजार वृक्षांची लागवड केली आहे. ही झाडे जगविण्यासाठी ठिबकचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. यासाठी विविध ठिकाणी २५ ते ३० पाण्याच्या टाक्या (२०० लीटर) बसविण्यात आल्या आहेत. तसेच संरक्षण जाळ्याही बसविण्यात आलेल्या आहेत. वृक्षसंवर्धनासाठी नागरिक स्वयंस्फूर्तीने श्रमदान करीत आहेत. झाडांना पाणी देणे, आळे करणे, साफसफाई करणे आदी कामे दररोज सकाळी व संध्याकाळी श्रमदानातून केली जात आहेत.
यासाठी वृक्षमित्र पोपट रसाळ, कृष्णा गुंड, संतोष मोटे, दत्तात्रय तांबे, विष्णूदास पाटील, शरद गहिले, रेखा सूर्यवंशी, सुशीला काळे, पूजा रसाळ, श्रीकांत देशमुख, प्रथमेश कुलकर्णी, गणेश जाधव, रवींद्र देवकर, गणेश मोईन, अविनाश फुलाटे, योगेश जगदाळे, विकास सोळंके, जयेश जगताप, विकास रॉय आदी परिश्रम घेत आहेत.