केबल टाकण्यासाठी रस्त्यांची केली जाते चाळणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:06 AM2021-02-25T04:06:01+5:302021-02-25T04:06:01+5:30
चिंचोली लिंबाजी : कोणतीही परवानगी न घेता एका खासगी मोबाईल कंपनीने केबल टाकण्यासाठी सार्वजनिक रस्त्यांची तोडफोड केल्याचा धक्कादायक प्रकार ...
चिंचोली लिंबाजी : कोणतीही परवानगी न घेता एका खासगी मोबाईल कंपनीने केबल टाकण्यासाठी सार्वजनिक रस्त्यांची तोडफोड केल्याचा धक्कादायक प्रकार चिंचोली लिंबाजी परिसरात घडल्याचे समोर आला आहे तर या खोदकामाकडे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई न करता दुर्लक्ष केले. त्यामुळे बांधकाम विभाग खासगी मोबाईल कंपनीच्या दावणीला बांधला आहे, असा सवाल उपस्थित झाला आहे.
एका नामांकित मोबाईल कंपनीच्या अधिकाऱ्यांनी परवानगी न घेता परस्पर चिंचोली लिंबाजी-घाटनांद्रा या रस्त्यावरील चिंचोली लिंबाजी ते टाकळी अंतूर हा रस्ता जेसीबीच्या साह्याने डांबरी रस्त्याला लागूनच चार खोदली जात आहे. चरीची काढलेली माती चक्क रस्त्याच्या मधोमध टाकली जात आहे. त्यामुळे वाहनधारकांना या रस्त्यावरून प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रस्त्यावर मातीचे ढीग पडल्याने अनेकवेळा वाहतूक कोंडी झाली. गेल्या दोन-तीन दिवसांपासून जेसीबीच्या साह्याने दिवासाढवळ्या रस्ता खोदला जात असताना याची माहिती सा. बां. विभागाच्या अधिकाऱ्यांना नव्हती का, जाणूनबुजून याकडे डोळेझाक करण्यात येत आहे, असा प्रश्न निर्माण होत आहे. यासंदर्भात कन्नडचे उपविभागीय अभियंता सोनकांबळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोन घेण्याची तसदी घेतली नाही.
गेल्या महिन्यातही असाच प्रकार घडला
मागील महिन्यात आणखी एका खासगी कंपनीच्या केबल टाकण्यासाठी बोरगाव-नागापूर-म्हैसघाट रस्ता खोदून केबल वायर टाकले होते. याविषयी ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर सार्वजनिक विभागाला जाग आली.
-
चिंचोली लिंबाजी : घाटनांद्रा या रस्त्यावरील चिंचोली लिंबाजी ते टाकळी अंतूरपर्यंत असा रस्ता जेसीबीच्या साह्याने खोदण्यात आला आहे.